पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या एका मंचावर, राज ठाकरेंचीही असणार उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) उद्या एका मंचावर असणार आहेत. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उपस्थिती असणार आहेत.
Lata Mangeshkar Award : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) उद्या एका मंचावर एकत्र दिसणार आहेत. उद्या पंतप्रधान मोदी यांना 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार प्रधान होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: उपस्थित राहणार आहेत. उषा मंगेशकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार दरवर्षी एका व्यक्तीला दिला जाणार आहे.
दरम्यान, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सुरू असलेला गदारोळ लक्षात घेता हा उद्याचा कार्यक्रम अतिशय खास असणार आहे. यापूर्वी 2021 मध्ये पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. दुसरीकडे, अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी आमचा निर्णय मागे घेत असल्याचे राणा दाम्पत्याने आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. 11 एप्रिल रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान उद्या मुंबईत येत आहेत.
महत्वाच्या बातम्या
Lata Mangeshkar Award : 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत उपस्थित राहणार
Rongali Bihu : रोंगाली बिहूचा कार्यक्रम आणि पंतप्रधानांचे पारंपरिक वाद्याचे वादन, व्हिडीओ होतोय व्हायरल
WHO chief visit to Gujarat : केम छो..मजामा! जेव्हा WHO प्रमुखांनी पंतप्रधान मोदींसमोर केली विचारपूस; सर्वत्र टाळ्यांचा कडकगडाट