PM Modi Swearing In Ceremony Live : उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसेंना संधी, केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार
NDA Cabinet Ministers List : उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांपैकी दोन जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला असून रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे.
NDA Cabinet Ministers List : नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) तिसऱ्या शपथविधीपूर्वी राज्यातील बड्या नेत्यांना दिल्लीतून फोनाफोनी सुरु आहे. भाजपकडून नितीन गडकरी (Nitin Gadkari), पीयूष गोयल (Piyush Goyal), शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांना मंत्रिपदासाठी फोन आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांचे नाव यांना मंत्रिपद मिळणार अशी चर्चा आहे. मात्र त्यांना अद्यापपर्यंत फोन आलेला नाही. तर रावेरच्या नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना देखील दिल्लीतून फोन आला असून रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे.
नव्या सरकारमध्ये एनडीएच्या (NDA) विविध घटकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांमध्ये चर्चा करण्यात आली असून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू, जेडीयू प्रमुख नितीश कुमार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांसारख्या नेत्यांसोबत चर्चा केली आहे. त्यानंतरच मंत्रीपदाची नावे ठरण्याची माहिती मिळत असून फोनाफोनी सुरु झाली आहे.
उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसेंना संधी
केंद्रीय मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातून कुणाला संधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी दिंडोरीच्या तत्कालीन खासदार डॉ. भारती पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्रिपदी डॉ. भारती पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र यंदा दिंडोरी लोकसभेची निवडणूक कांद्याच्या मुद्यावरून रंगली. डॉ. भारती पवार यांच्यावर कांदा उत्पादकांचा रोष होता. याचा फटका त्यांना निवडणुकीत बसला असून त्यांचा भास्कर भगरे यांनी पराभव केला. तर उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांमधून महायुतीला केवळ दोन जागा जिंकता आल्या आहेत. यात जळगावातून भाजपच्या स्मिता वाघ आणि रावेरमधून रक्षा खडसे यांचा समावेश आहे. या दोन खासदारांमधून रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागली आहे. रक्षा खडसे या सलग तिसऱ्यांदा खासदार झाल्या आहेत. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याचे बोलले जात आहे.
आतापर्यंत कुणाकुणाला फोन आलेत?
- जीतन राम मांझी, हिंदुस्थान आवाम मोर्चा
- जयंत चौधरी, राष्ट्रीय लोकदल
- अनुप्रिया पटेल, अपना दल
- डी आर चंद्रशेखर, तेलगू देसम पार्टी
- के. राम मोहन नायडू, तेलगू देसम पार्टी
- नितीन गडकरी, भारतीय जनता पार्टी
- राजनाथ सिंह, भारतीय जनता पार्टी
- अमित शाह, भारतीय जनता पार्टी
- अर्जुनराम मेघावाल, भारतीय जनता पार्टी
- राम नाथ ठाकुर, जनता दल युनायटेड
- एच.डी.कुमारस्वामी, जनता दल सेक्युलर
- सुदेश महतो, ऑल झारखंड स्टुडंट्स युनिअन
- चिराग पासवान, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)
- मनसुख मांडविय, भारतीय जनता पार्टी
- रक्षा खडसे (भाजप)
- रामदास आठवले (रिपाइं (ए))
आणखी वाचा