एक्स्प्लोर
पंकजा मुंडे, बावनकुळेंचा दौरा रद्द, परळी वीज केंद्र सुरु होण्याचा मुहूर्त लांबला
बीडः ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आजचा परळी दौरा रद्द झाल्यामुळे परळी औष्णिक विद्युत केंद्राचा शुभारंभ आठवडाभराने पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे पुढचा आठवडाभर राज्याच्या वीज निर्मितीत एक हजार मेगा वॅटचा तुटवडा कायम राहणार आहे.
परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्र सुरू करणे आणि तालुक्यातील वीज उपकेंद्रांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत परळी येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र मुंबईतील खराब हवामानामुळे विमान उड्डाण रद्द झाल्याने दोन्ही मंत्र्यांना विमानतळावरुन परतावं लागलं. त्यामुळे हे सर्व कार्यक्रम आता 3 किंवा 4 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे.
उर्जामंत्र्यांचा उद्घाटनाचा अट्टाहास?
परळी औष्णिक विद्युत केंद्र सुरु झाल्यास महाराष्ट्राच्या वीज निर्मितीत एक हजार मेगावॉटची भर पडणार आहे. परळी औष्णिक वीज केंद्र आपल्या हाताने सुरु करण्यात यावं, अशी उर्जामंत्र्यांची इच्छा होती. त्यामुळे आजचा मुहूर्त निश्चित केला होता.
मराठवाड्यातील दुष्काळाचा सर्वात मोठा फटका परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राला बसला. पाण्याअभावी तब्बल तेरा महिने येथील वीज निर्मिती बंद होती. जायकवाडीतून पाणी सोडल्याने हे वीज निर्मिती केंद्र सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पंकजा मुंडेनी जायकवाडीतून परळी औष्णिक वीज केंद्राला पाणी सोडण्यासाठी खास आग्रह धरला होता. अखेर पाणी परळीत दाखलही झालं. पण वीजनिर्मिती अजूनही सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहे.
राज्यातील सध्याची वीजनिर्मीतीची स्थिती
कोळशापासून वीज निर्मिती करणारा हा मराठवाड्यातील एकमेव प्रकल्प आहे. सुरुवातीला सात संचातून वीजनिर्मिती केली जात होती. मात्र कालांतराने यातील 2 संच कायमचे बंद करण्यात आले. मात्र जायकवाडीतून पाणी सोडल्यानंतर बंद स्थितीत असलेले संच पुन्हा सुरु होण्याची आशा निर्माण झाली होती.
परळी औष्णिक वीज केंद्रातील एकही संच अजून चालू केला नसल्याचं या माहितीच्या आधारे दिसत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement