एक्स्प्लोर
Advertisement
मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला मला सोडायचं असेल तर निर्णय घ्यावा : पंकजा मुंडे
गोपीनाथ गडावर आयोजित मेळाव्यादरम्यान केलेल्या भाषणादरम्यान पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांवर, प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. पंकजा मुंडे म्हणाल्या की, कोणताही पक्ष एका व्यक्तीच्या मालकीचा नसतो.
बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज (12 डिसेंबर) जयंती आहे. या निमित्ताने त्यांची कन्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावर खास मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यांच्यासह नेते, पदाधिकारी आणि पंकजा मुंडे यांचे समर्थक उपस्थित होते.
यावेळी केलेल्या भाषणादरम्यान पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांवर, प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. पंकजा मुंडे म्हणाल्या की, कोणताही पक्ष एका व्यक्तीच्या मालकीचा नसतो. असे म्हणत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी फेसबुकवर पोस्ट लिहून या मेळाव्यासाठी आव्हान केले. त्याच्या दोन दिवसांनंतर मी पक्ष सोडणार, मी पक्षाविरोधात बंडखोरी करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. परंतु आज मी या व्यासपीठावरुन सांगू इच्छिते की, मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला जर मला सोडायचं असेल तर त्यांनी निर्णय घ्यावा.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी आज जाहीर करते, मी आता भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीतून मुक्त होत आहे. पुढील काही दिवसात मी गोपीनाथ मुंडेचे औरंगाबादमधील कार्यालय पुन्हा सुरु करणार आहे. 26 डिसेंबरपासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement