एक्स्प्लोर
पंडीतअण्णा मुंडेंवर आज अंत्यसंस्कार, पंकजा मुंडेही उपस्थित
बीड : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वडील आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचे ज्येष्ठ बंधू पंडीतअण्णा मुंडे यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. परळी जवळील कन्हेरवाडी इथे आज दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील
दरम्यान, पंडीतअण्णा मुंडे यांच्या अंत्यसंस्काराच्या पार्श्वभूमीवर आज परळी शहर बंद ठेवण्यात आलं आहे.
धनंजय मुंडेंना पितृशोक, पंडीतअण्णा मुंडेंचं निधन
पंडीतअण्णा मुंडे यांचं काल (13 ऑक्टोबर) रोजी दीर्घ आजाराने निधन झालं. बीडमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 75 वर्षांचे होते. पंडीतअण्णा यांच्या पुतणी आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यादेखील अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत. पंकजा मुंडेंसह त्यांच्या आई प्रज्ञा मुंडे, पती अमित पालवे, खासदार डॉ. प्रीतम मुंडेही असतील.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
व्यापार-उद्योग
क्राईम
शिक्षण
Advertisement