एक्स्प्लोर
Advertisement
कोळी महादेव समाजातील तरुणांचं वाळूत पुरुन घेत आंदोलन
आषाढी यात्रा काळात कोळी महादेव समाजाचे आंदोलन थांबवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांची पंढरपूरमध्ये बैठक घेऊन प्रश्न सोडवला होता.
पंढरपूर : सरकारच्या आदेशानंतरही जातीचे दाखल अधिकारी अडवू लागल्याच्या निषेधार्ध आज कोळी महादेव समाजातील तरुणांनी अनोखं आंदोलन केलं. या तरुणांनी चंद्रभागेच्या वाळवंटातील वाल्मिकी मंदिरासमोरील वाळूत स्वत:ला गाढून घेत आक्रोश आंदोलन केलं.
खरंतर आज महर्षी वाल्मिकी यांची जयंती असल्याने समाजाचा उत्सवाचा दिवस होता. मात्र शासकीय आदेशानंतरही प्रशासनाकडून जातीच्या दाखल्यात अडचणी येत असल्याच्या निषेधार्थ, तरुणांनी उत्सवाऐवजी आक्रोश आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला .
आषाढी यात्रा काळात कोळी महादेव समाजाचे आंदोलन थांबवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांची पंढरपूरमध्ये बैठक घेऊन प्रश्न सोडवला होता. समाजकल्याण मंत्री आणि पालकमंत्र्यांनी जातीच्या दाखल्यांसदर्भातील बैठकीत आदेश दिला होता.
त्यानुसार सुरुवातीला अनेकांना जातीचे दाखलेही मिळाले. पण नंतर अधिकाऱ्यांनी पुन्हा दाखले अडवण्यास सुरुवात केली. त्यामुळे तरुणांवर असं आंदोलन करण्याची वेळ आल्याचं महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
महाराष्ट्र
भारत
Advertisement