एक्स्प्लोर
पोटनिवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा, नायब तहसीलदार निलंबित
पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीत कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल पलूस तालुक्याचे महसूल नायब तहसीलदार एन.बी.मोरे यांना निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांताधिकारी डॉ.विजय देशमुख यांनी निलंबित केलं आहे.

सांगली : पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीत कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल पलूस तालुक्याचे महसूल नायब तहसीलदार एन.बी.मोरे यांना निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांताधिकारी डॉ.विजय देशमुख यांनी निलंबित केलं आहे. माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभच्या पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीबाबत पलूस तालुक्याचे नायब तहसीलदार एन.बी.मोरे यांच्याकडे वाहतूक आराखडा तयार करणे, खासगी वाहने अधिग्रहण करणे, निवडणुकीसाठी लागणारे इव्हीएमएलसी करणे. ही कामे सोपवण्यात आली होती. परंतु मोरे यांनी याबाबत कोणतीच कार्यवाही केली नाही. याबाबत वारंवार तोंडी व दूरध्वनीवरुन सांगूनही त्यांनी नेमून दिलेल्या कामात दिरंगाई केल्याने आणि ५ मे पासून ते निवडणूक कामावर हजरही न राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विजय देशमुख यांना निलंबित केलं.
आणखी वाचा























