एक्स्प्लोर
पालघरमधील आग आटोक्यात, चार कंपन्या खाक

पालघर : पालघरच्या बिडको नाका परिसरात निशांत अरोमाज या कंपनीला लागलेली आग साडे चार तासांनी आटोक्यात आली आहे. या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे. शिवाय आग पसरल्याने शेजारच्या तीन कंपन्याही जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
निशांत अरोमाज कंपनीला आज दुपारी 4.15 वाजता भीषण आग लागली होती. शिवाय आग पसरल्याने डिलक्स, ट्रान्सफॉर्मर इशार आणि सुंदरम या कंपन्याही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
निशांत आरोमस या कंपनीत परफ्यूम बनवले जातात. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
आगीत प्लास्टिक बनवणारी डिलक्स कंपनी, ट्रान्सफार्मर बनवणारी ट्रान्सफॉर्मर इशार कंपनी आणि वह्या बनवणारी सुंदरम कंपनीचंही नुकसान झालं आहे.
दरम्यान, या कंपन्या पालघर जिल्हा कार्यालयाच्या अगदी जवळ आहे. आग लागली त्यावेळी जिल्हा अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महसूल कर्मचारी तिथे उपस्थित होते. या घटनेनंतर कंपनीच्या परिसरात कडेकोट पोलिस बंद ठेवण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
