एक्स्प्लोर
Advertisement
साताऱ्यात एका कोरोनाबाधितासह तीन संशयित रुग्णांचा मृत्यू
साताऱ्यात काल आठ रुग्णांवर उपचार देऊन त्यांना घरी सोडण्यात आले. सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 201 झाला आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यात काल रात्रीत 16 रुग्ण पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर आज एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. तर तीन कोविड संशयीत रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अमोद गडीकर यांनी दिली आहे. या मृतांमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. कोरोना बाधित मृत व्यक्ती हा जावळी तालुक्यातील वरोशी या गावातील असून उर्वरीत संशयितांमध्ये पाचगणी, कराड, उंब्रज येथील व्यक्तीचा समावेश आहे. त्याच बरोबर काल रात्रीत 16 रुग्णांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत.
साताऱ्यात काल आठ रुग्णांवर उपचार देऊन त्यांना घरी सोडण्यात आले. यामध्ये तरडगाव ता. फलटण येथील महिला आणि सहा वर्षाचा मुलगा, फलटण येथील एक महिला, खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील 13 वर्षांची मुलगी, कोडोली सातारा येथील 18 वर्षाचा युवक, महाबळेश्वर येथील 23 वर्षीय युवक, त्रिपूटी, कोरेगाव येथील एक पुरुष व खटाव तालुक्यातील खरसिंगे या गावचा युवक असे एकूण आठ जण कोरोना मुक्त झाले आणि त्यांना घरी सोडण्यात आले असल्याचे डॉ. गडीकर यांनी कळवले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 106 नागरिक कोराना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. आता सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 201 झाला आहे.
देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात काल 2345 कोरोनाबाधितांची वाढ झाली. दिलासादायक म्हणजे 1408 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 41 हजार 642 झाला आहे. त्यातील 11 हजार 726 बरे झाले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 28.15 टक्के आहे. तर राज्यात आतापर्यंत 1 हजार 454 जण मृत्यूमुखी पडले आहेत. यापैकी मुंबईत 25 हजार 500 कोरोनाबाधित सापडले आहेत त्यातील 882 जणांचा बळी गेले आहेत.
काल राज्यात 64 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी 41 जण मुंबई, मालेगाव 9, पुण्यात 7, औरंगाबाद 3, नवी मुंबईमध्ये 2, पिंपरी चिंचवड आणि सोलापूर शहरात प्रत्येकी एक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1454 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 1408 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात कालपर्यंत पाठवण्यात आलेल्या 3 लाख 19 हजार 710 नमुन्यांपैकी 2 लाख 78 हजार 68 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 41,642 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 37 हजार 304 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 26 हजार 865 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 11,726 कोरोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रीडा
भारत
बॉलीवूड
Advertisement