एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंकजा मुंडेच काय राज्यातील अनेक मोठे नेते संपर्कात : संजय राऊत
माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या ट्विटर हॅण्डलवर सध्या भारतीय जनता पक्षाचा उल्लेख नाही. ट्विटर हॅण्टलवरील बायोमधून पंकजा मुंडे यांनी भाजपच्या पदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत.
मुंबई : पंकजा मुंडेच काय, तर राज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय, पंकजा मुंडेंबाबत 12 डिसेंबरलाच कळेल, असंही राऊतांनी स्पष्ट केलं आहे. पंकजा मुंडे यांच्या कालच्या फेसबुक पोस्ट आणि आज ट्विटर हॅण्डलवर भाजपचा उल्लेख नसल्याने, त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या ट्विटर हॅण्डलवर सध्या भारतीय जनता पक्षाचा उल्लेख नाही. ट्विटर हॅण्टलवरील बायोमधून पंकजा मुंडे यांनी भाजपच्या पदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, "शिवसेनेच्या वाटेवर अनेक प्रमुख लोक आहेत. मी आता नाव घेत नाही. पंकजा मुंडेंबाबत 12 डिसेंबरलाच कळेल. महाराष्ट्रातले अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या वाटेवर आहेत."
राजकीय पुनर्वसनाच्या दृष्टीने दबावाचा प्राथमिक प्रयत्न असू शकतो : अभय देशपांडे
"गोपीनाथ मुंडे आणि ठाकरे घराण्याचे संबंध चांगले आहेत. युती तुटल्यानंतरही त्यांनी जाहीर भूमिका घेतली होती. भाजपमधून बाहेर पडल्या तर त्यांना शिवसेना हा जवळचा पक्ष आहे. राष्ट्रवादीत त्या जाऊ शकत नाहीत, कारण तिथे धनंजय मुंडे एस्टॅबलिश आहेत. तर काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा त्या शिवसेनेत जाणं राजकीयदृष्ट्या फायद्याचं ठरेलं. राजकीय पुनर्वसनाच्या दृष्टीने दबाव आणण्याचा प्राथमिक प्रयत्न असू शकतं. तसं नाही झाल्यास त्या शिवसेनेत गेल्या तर आश्चर्य वाटू नये," असं मत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी व्यक्त केलं.
पंकजा मुंडे यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन भाजपचा उल्लेख गायब
कोणकोणते नेते नाराज असल्याची चर्चा?
अनेक मोठे नेते संपर्कात असल्याची संजय राऊत यांची शक्यता टाळता येणार नाही. सत्तांतरण झालं आहे. सत्तेच्याच बाजूला अनेकांचा कल असतो. त्यामुळे अनेक मोठी नावं आहेत. एकनाख खडसे यांनी आमदारांच्या शपथविधीच्या दिवशीच नाराजी व्यक्त केली होती. तसंच भाजप, देवेंद्र फडणवीस सरकारचे वाभाडे काढले होते. मुलुंडचे भाजप आमदार सरदार तारासिंह यांनीही मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना भेटून शुभेच्छा दिल्या होत्या. याशिवा. प्रकाश मेहतासारखा मुंबईतील एकमेव गुजराती चेहरा, ज्यांना तिकीट डावललं होतं. ते सुद्धा या प्रक्रियेत कुठेही दिसले नाहीत, वक्तव्य करताना दिसले नाहीत. भविष्यात या नेत्यांची फळी भविष्यात बोलताना दिसेल, नाराजी व्यक्त करताना दिसतील. त्यामुळे हे नेते शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं पाहणं उत्सुकतेचं असेल.
ट्विटर हॅण्डलवरुन भाजपचा उल्लेख गायब
माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या ट्विटर हॅण्डलवर सध्या भारतीय जनता पक्षाचा उल्लेख नाही. ट्विटर हॅण्टलवरील बायोमधून पंकजा मुंडे यांनी भाजपच्या पदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. शिवाय पंकजा मुंडे यांनी काल (1 डिसेंबर) फेसबुक पोस्ट लिहून, 12 डिसेंबर रोजी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं घोषित केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे 12 डिसेंबर रोजी काय सांगणार आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांना संपर्क केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. परळी मतदारसंघात त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
सोलापूर
Advertisement