एक्स्प्लोर
Advertisement
नवविवाहित जोडप्यांना यापुढे जेजुरीच्या खंडोबाचे थेट दर्शन
महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या दर्शनासाठी नववधू आणि वर आवर्जून जातात. यापुढे अशा नवदाम्पत्यांना थेट मंदिरात प्रवेश देऊन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतला आहे.
जेजुरी : महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या दर्शनासाठी नववधू आणि वर आवर्जून जातात. यापुढे अशा नवदाम्पत्यांना थेट मंदिरात प्रवेश देऊन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतला आहे. इतकंच नाही तर नववधूची खणा-नारळाने ओटीही भरण्यात येणार आहे.
नववधू आणि वराला थेट दर्शन मिळणार असलं तरीही त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांना मात्र, दर्शनरांगेनेच यावं लागणार आहे. शनिवारपासून हा निर्णय लागूही करण्यात आला आहे.
विवाहानंतर आपल्या नवजीवनाची सुरुवात करण्यापूर्वी नववधू आणि वर जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला येतात. यावेळी इथे तळीभंडार, जागरण-गोंधळ हे धार्मिक विधीही केले जातात.
गेल्या काही वर्षात इथं भाविकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. त्यामुळे नवविवाहित दाम्पत्यांना देखील दर्शन रांगेत तासनतास उभे राहावे लागते. दरम्यान, यापुढे नवविवाहित जोडप्याला दर्शन रांगेत उभं राहावं लागू नये यासाठीच थेट दर्शनाचा निर्णय जेजुरी मंदिर व्यवस्थापनाने घेतला आहे.
असं मिळणार नवविवाहित जोडप्याला थेट दर्शन :
सर्वप्रथम नवविवाहित जोडप्याला मंदिर आवारातील कार्यालयात जाऊन रजिस्टरमध्ये नोंद करावी लागेल. त्यानंतर येथील कर्मचारी त्यांना मुख्य मंदिरात घेऊन जातील. पुन्हा कार्यालयात आणून नववधूची खणा-नारळाने ओटीही भरण्यात येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement