एक्स्प्लोर

Ajit Pawar : आधी मलईदार खाती आणि आता पालकमंत्री; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजीचा खेळ करत दुसऱ्यांदा शिंदे गटाचा केला 'गेम'!

New Guardian Ministers : राज्यातील 12 जिल्ह्यांची पालकमंत्र्यांची सुधारित यादी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. या यादीमध्ये पूर्णतः अजित पवार गटाचा वरचष्मा राहिला आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडून भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला (Shinde Group) कात्रजचा घाट दाखवला आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नाराज असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यामुळे नाराज अजित पवार पुन्हा एकदा कोणता मोठा निर्णय घेणार का? इथपर्यंत ही चर्चा जाऊन पोहोचली होती. मात्र, आता या नाराजीचा सर्व उलगडा आज ( 4 ऑक्टोबर) एका क्षणामध्ये झाला आहे. राज्यातील सुधारित पालकमंत्री (New Guardian Ministers) जाहीर करण्यात आले असून अजित पवार गटातील तब्बल सात मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. 

पुण्यातून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी 

राज्यातील 12 जिल्ह्यांची पालकमंत्र्यांची सुधारित यादी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. या यादीमध्ये पूर्णतः अजित पवार गटाचा वरचष्मा राहिला आहे. या यादीमध्ये अजित पवार गटातील तब्बल सात मंत्र्यांना पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर पुण्यातून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करून त्या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जबाबदारी घेतली आहे. दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांना दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली. त्याचबरोबर कोल्हापूरमधूनही शिंदे गटाची उचलबांगडी करण्यात आली आहे. याठिकाणी दीपक केसरकर यांना पालकमंत्री पदावरून बाजूला करून त्या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे त्यांच्या बीड जिल्ह्याचे याच पालकत्व देण्यात आलं आहे. 


Ajit Pawar : आधी मलईदार खाती आणि आता पालकमंत्री; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजीचा खेळ करत दुसऱ्यांदा शिंदे गटाचा केला 'गेम'!

तीन जिल्ह्यातील तिढा कायम

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्रीपदामध्ये सर्वाधिक चर्चा रायगडच्या पालकमंत्री पदावरून रंगली होती. त्या ठिकाणी शिंदे गटाने केलेल्या दाव्यामुळे त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जाणार कोणाकडे याची चर्चा अजूनही आहे. रायगड जिल्ह्यासह सातारा आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे एकंदरीत या जिल्ह्यावरून तिन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकदा धुमशान होण्याची चिन्हे आहेत.  

अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिंदे गटाकडून सातत्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली, अशी स्थिती मुख्यमंत्री शिंदे गटाची राहिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज चर्चा असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने दिल्लीला गेले होते. या भेटीमध्येच पालकमंत्रीपदाचा निकाल लागला आहे. त्यामुळे आता एकंदरीतच एकंदरीत पालकमंत्रीपदाचा तिढा काहीसा सुटला असला, तरी शिंदे गटाची नाराजी पुन्हा एकदा वाढत जाण्याची शक्यता आहे. अजित पवार महाविकास आघाडीमध्ये असतानाही शिंदे गटांतील नेत्यांकडून त्यांच्यावर आरोप केले होते. आता सत्तेत सहभागी झाल्यानंतर सुद्धा अजित पवार यांचाच वरचष्मा राहत असल्याने शिंदे गटाची अवस्था बिकट होत चालली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget