एक्स्प्लोर

Hasan Mushrif : कोल्हापुरातून शिंदे गटाच्या दीपक केसरकरांची उचलबांगडी अन् पालकमंत्रिपदाची हसन मुश्रीफांची 'स्वप्नपूर्ती'!

कोल्हापूरमध्ये (Kolhapur) शिंदे गटाच्या दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती. ती आता अर्थातच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याकडे आली आहे.

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतरही पालकमंत्रीपदाचा (Guardian Minister) पेच सुटलेला नव्हता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा नाराजीचा खेळ करत पालकमंत्रीपदातही बाजी मारली आहे. त्यामुळे शिंदे गटात पुन्हा एकदा सन्नाटा निर्माण झाला आहे. आज (4 ऑक्टोबर) 11 जिल्ह्यांची सुधारित यादी जाहीर करण्यात आली. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) शिंदे गटाच्या दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती. ती आता अर्थातच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याकडे आली आहे. त्यामुळे शिंदे गटाला कोल्हापूरचे पालकत्व सोडावं लागलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची चांगलीच चर्चा रंगली होती. कोल्हापूरचे पालकमंत्री कोण होणार? या संदर्भात सातत्याने चर्चा होती. पालकमंत्रीपदाची जबाबदारी दीपक केसरकर यांच्याकडे असूनही चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. मात्र, कोल्हापुरात 15 ऑगस्टला ध्वजारोहण थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच केल्याने एकप्रकारे कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदावर दावा करत शिंदे गटाला इशारा दिला होता. 

कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून स्वप्नपूर्ती

मुश्रीफ यांचे कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून स्वप्न पूर्ण झालं नव्हतं. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर अहिल्यादेवी होळकर नगर जिल्ह्याची जबाबदारी त्यांना मिळाली होती, तर कोल्हापूरचं पालकत्व पहिल्यांदा बाळासाहेब थोरात यांच्या वाट्याला आल्यानंतर त्यांनी ते नंतर सतेज पाटील यांच्याकडे दिलं होतं. त्यामुळे हसन मुश्रीफ हे कॅबिनेट मंत्री असूनही कोल्हापूरचे पालकमंत्री होऊ शकले नव्हते. त्यामुळे आता ही कसर आता भरून निघाल्याने त्यांची स्वप्नपूर्ती झाली आहे. 

दीपक केसरकरांविरोधात भाजपची नाराजी

अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर मातब्बर खाती आपल्या पदरात पाडून घेतली आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रीपदाचाही पेच कायम होता. मावळते पालकमंत्री दीपक केसरकरांच्या कार्यशैलीवरून कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड नाराजी होती. मेन राजाराम स्थलांर, पुरावरून विधान, शेतकरी संघाची जागा ताब्यात घेण्यावरून त्यांच्यावर कोल्हापुरात टीकेची झोड उठली होती. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री अजित पवार गटाकडे येण्याचेच संकेत अजित पवार यांच्या ध्वजारोहणातून मिळाले होते.  दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्याने राजकीय परिस्थिती बदलली आहे. शिंदे गटाचे केसरकर हे कोल्हापूरचे पालकमंत्री असूनही त्यांच्या विरोधात भाजपने मोर्चा खोलला होता. हे पालकमंत्री नव्हे, तर पर्यटनमंत्री असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. जिल्ह्यातील विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या नेमणुकीवरून भाजपने त्यांच्यावर थेट हल्लाबोल केला होती. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री बदलले जातील, असेच एकंदरीत चित्र होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Bhaskarrao Khatgaonkar : अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
Rupali Chakankar: 'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हानसकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 at 8AM 20 Sept 2024सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 20 September 2024Nagpur Fire crackers : गणेश विसर्जनादरम्यान उमरेडमध्ये फटाक्यांचा आतशबाजीत ११ महिला भाजल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Bhaskarrao Khatgaonkar : अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
Rupali Chakankar: 'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
Nagpur Ganesh Visarjan: गणपतीच्या मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
गणपती मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
Horoscope Today 20 September 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
Embed widget