एक्स्प्लोर

'नाना पटोले मविआमधील एकमेव नेते, जे काँग्रेसमध्ये राहून भाजपचं काम उघडपणे करताहेत', राष्ट्रवादीच्या नेत्याची थेट टीका

राष्ट्रवादी युवक कांग्रेस कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. नाना पटोले हे मविआमधील एकमेव नेते आहेत जे काँग्रेसमध्ये राहून भाजपचं काम करत आहेत, असं ट्वीट केलं आहे.

NCP Suraj Chavan On Nana Patole:  सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) अंतर्गत वातावरण बिघडलेलं दिसून येत आहे. आता  राष्ट्रवादी युवक कांग्रेस कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी नाना पटोले यांच्यावर ट्वीट करत जहरी टीका केली आहे. नाना पटोले हे मविआमधील एकमेव नेते आहेत जे काँग्रेसमध्ये राहून भाजपचं काम करत आहेत, असं ट्वीट केलं आहे. सत्यजीत तांबे यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद सुरू झाल्याचा प्रश्न उपस्थित या निमित्तानं चर्चिला जात आहे.

सत्यजीत तांबे नेमकं काय म्हणाले...

नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituency) झालेल्या आरोपानंतर आज सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे नाव न घेता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुकीदरम्यान ज्या पद्धतीने काँग्रेसकडून एबी फॉर्म पाठवण्यात आल्याचे सांगितले गेले, मात्र हे एबी फॉर्मचा चुकीचे असल्याचे समजले. त्यामुळे शेवटी अपक्ष फॉर्म भरावा लागला. महत्वाचे म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस नावांनीच फॉर्म भरला होता, परंतु एबी फॉर्म सोडून न शकल्यामुळे तो खूप अर्ज अपक्ष म्हणून कन्व्हर्ट झाला. तिथून बाहेर आल्यानंतर पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट सांगितलं की मी काँग्रेसचा उमेदवार आहे, हे माझं पहिलं वाक्य होत, असं स्पष्टीकरण यावेळी तांबेंनी दिले आहे. 

नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यान काँग्रेसने सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली असताना सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. यावरून काँग्रेसने त्यांना निलंबित केलं. हे सगळं असताना सत्यजित तांबे यांनी या सगळ्यामागील नेमकं कारण आज स्पष्ट केले आहे. त्यानुसार ते म्हणाले कि, टाय दिवशी आम्हाला जे एबी फॉर्म दिले होते ते चुकीचे होते. एक नागपूर व दुसरा औरंगाबाद साठी होता, नाशिकच्या निवडणुकीचा एबी फॉर्म नव्हताच. तरीदेखील आम्हाला खोटं ठरविण्यात आले. शेवटच्या क्षणी अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा लागला. त्यात देखील काँग्रेस पक्षाचा उल्लेख केला होता. मात्र तांबे कुटुंबियांना काँग्रेसमधून बाहेर काढण्यासाठी युवक उमेदवाराला संधी न देण्यासाठी, थोरातांना अडचणीत आणण्यासाठी हा सगळी स्टोरी रचल्याचा आरोप सत्यजित तांबे यांनी केला आहे. 

सगळी स्क्रिप्टेड स्टोरी... 

एकीकडे उमेदवारी करण्याचा निर्णय तांबे परिवाराला देण्यात आला. दुसरीकडे वडिलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. जर माझे वडील सांगताहेत की मला उभं राहायचं नाही, माझ्या मुलाला करायचं आहे. तर माझ्या वडिलांची उमेदवारी साडेबारा वाजता का जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातल्या एकही विधान परिषदेचा उमेदवार दिल्लीतून जाहीर झाला नाही. अमरावतीतून जे निवडून आले, त्यांचे नाव दिल्लीतून आलं का? नागपूर शिक्षक मतदार संघातून जे निवडून आले त्यांचे नाव दिल्लीतून जाहीर झालं का? मग आम्हालाच उमेदवारी का बर दिल्लीतून दिली. हा पूर्णपणे एका षडयंत्राचा भाग आहे. ही स्क्रिप्टेड स्टोरी होती. ती स्टोरी बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी, सत्यजित तांबेला उमेदवारी मिळू नये यासाठी, आमच्या परिवाराला कुठेतरी पक्षाच्या बाहेर ढकलण्यासाठी होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलंJalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडलेGulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रियाJalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक,  जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Embed widget