एक्स्प्लोर

Exam Fees: शंभर रुपयात कलेक्टर होतात, पण तलाठी होण्यासाठी 1000 रुपये फी; रोहित पवारांच्या भाषणाने स्पर्धा परीक्षा शुल्काचा मुद्दा ऐरणीवर

Competitive Examination Fees: स्पर्धा परीक्षांच्या शुल्काच्या (Competitive Examination Fees) माध्यमातून सरकार, परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्या कमाई करत असल्याची चर्चा सुरू असते. विधानसभेत रोहित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Rohit Pawar On Exam Fees:  मागील काही दशकांपासून खासगीकरण, कंत्राटीकरणाचा रेटा वाढत चालला असताना दुसरीकडे सरकारी, निमसरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी काही जागा निघाल्या तरी त्यासाठी लाखो अर्ज दाखल होतात. मात्र, या स्पर्धा परीक्षांच्या शुल्काच्या (Competitive Examination Fees) माध्यमातून सरकार, परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्या कमाई करत असल्याची चर्चा सुरू असते. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हाच मुद्दा विधानसभेत उचलल्याने परीक्षा शुल्काचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

बुधवारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विविध मुद्यांवर भाषण केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात स्पर्धा परीक्षांच्या शुल्काचा मुद्दा उपस्थित केला. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) परीक्षा शुल्क म्हणून 100 रुपये,  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) 350 रुपये तर राजस्थान सरकार सगळ्या परीक्षांसाठी केवळ 600 रुपये आकारते. असे असताना राज्य सरकार केवळ तलाठी भरतीच्या एका परिक्षेसाठी 900 ते एक हजार रुपये शुल्क का आकारते, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. खासगी कंपन्यांचे खिशे का भरले जातात? सामन्यांचे प्रश्न सुटत नसतील तर आमदार होऊन करायचं काय? असा उद्गविन सवालही त्यांनी केला. 

रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्याला नेटिझन्सकडून प्रतिसाद मिळाला. हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल आभार मानताना एका युजरने आमच्या आईवडिलांच्या कष्टाने कमावलेल्या पैश्याची लुट करून खासगी कंपन्यांचे खिसे भरले जात असल्याचा आरोप केला. परीक्षा शुल्काचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे एका युजरने म्हटले. 

4644 जागांसाठी तब्बल 13 लाख अर्ज, सरकारच्या तिजोरीत 127 कोटी

सरकारने काढलेल्या तलाठी भरतीत लाखो तरुण आपले नशीब आजमवायला निघाले आहेत. कारण 4644 जागांसाठी तब्बल 13 लाखांच्या जवळपास अर्ज दाखल झाले आहेत. या परीक्षा शुल्कापोटीच शासनाच्या तिजोरीत 127 कोटी जमा झाले आहेत. तलाठी पदाच्या परीक्षेसाठी पीएचडी धारक, इंजिनिअर, एमबीए झालेले उच्चशिक्षित तरुणांनी अर्ज केला आहे. 

4 वर्षानंतर राज्यात तलाठी गट(क) भरतीला मुहूर्त लागलाय. सरकारने 4644 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली. 26 जूनपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली. 23 जुलै पर्यंत राज्यातील तब्बल 13 लाखांच्या जवळ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. 

तलाठी पदासाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. 23  जुलैपर्यंत शासनाकडे 12 लाख 77 हजार 100अर्ज आले आहेत. ज्याची एकूण शुल्क रक्कम तब्बल 127 कोटी रुपये हे शासकीय तिजोरीत जमा झाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget