(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nawab Malik : 'केंद्र सरकार म्हटलं की ई़डी नावाचा वेताळ मानगुटीवर बसतो,' काँग्रेस नेते सचिन सावंत यांची संतप्त प्रतिक्रिया
Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ईडीकडून नुकतीच अटक करण्यात आली असून यानंतर मविआ नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
Nawab Malik Arrest : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी सुरू झाली. ईडीने सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली होती. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान मलिक यांना अटक केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ईडी यंत्रणेला वेताळ असं म्हणत केंद्र सरकारच्या म्हणण्यावरुन ईडी हवं त्याच्या मानगुटीवर बसते, अशी सतंप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
नवाब मलिकांच्या अटकेनंतर सचिन सावंत यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी याबाबत बोलताना म्हणाले, ''मोदी सरकारने लोकशाहीवर आघात करत आयसीयूमध्ये पोहोचवली आहे. असंच सुरु राहिल्यास लोकशाहीला आदरांजली वाहण्याचा दिवस येईल. त्यामुळे वेळीच हे सर्व रोखायला हवं. तसंच विक्रम-वेताळ गोष्टीत जसं विक्रम बोलाकी वेताळ उडून जायचा, तसंच केंद्र सरकार बोलेल त्याच्या मानगुटीवर ईडी जाऊन बसतं. केंद्र सरकार ईडी, सीबीआय या यंत्रणांचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करत आहे.
'सरकार पाडण्यासाठी हे सर्व'
पुढे बोलताना सचिन सावंत म्हणाले, 'हे सर्व सरकारकडून राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी केले जात आहे. सरकार पाडण्यासाठी ते कुठल्याही स्थरावर जातील. याआधी मध्यप्रदेश, राजस्थान याठिकाणी सरकार पाडण्यासाठी अशाचप्रकारे सीबीआय रेड घडवण्यात आल्या होत्या. तसंच महाविकास आघाडीचा हा लढा सत्तेसाठी नाही तर ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठीची आहे.'
नवाब मलिकांवर कोणते आरोप?
अंडरवर्ल्डशी संबंध, त्यांच्याशी संबंधित पैशाचा वापर करणे, हा पैसा परदेशात पाठवणे या आरोपाखाली ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. आता या प्रकरणी सर्व पुरावा न्यायालयात मांडण्यात येणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Nawab Malik: ईडीकडून अटकेनंतर नवाब मलिक मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची शक्यता
- Nawab Malik Arrest : मोठी बातमी! आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक
- Nawab Malik: नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी; जाणून घ्या दिवसभरात आज काय काय घडलं?