एक्स्प्लोर

Nashik News : 'आपण कुठेही गेलो तरी फुले, शाहू आंबेडकरांचा वारसा सोडणार नाही', मंत्री छगन भुजबळ यांची ग्वाही 

Nashik News : शिक्षणासाठी योगदान देणारे सर्व महापुरुष आपल्या सर्वांची दैवत असली पाहिजे, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. 

नाशिक : बहुजन समाजाला ज्या महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्यासह ज्या कर्मवीरांनी योगदान दिलं, ही सर्व माझी दैवत आहेत. शिक्षणासाठी योगदान देणारे हे सर्व महापुरुष आपल्या सर्वांची दैवत असली पाहिजे असे सांगत आपण कुठेही गेलो, तरी त्यांचे विचार कदापिही सोडणार नाही, असे मत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले. 

कर्मवीर रावसाहेब थोरात (Raosaheb Thorat) यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मविप्र संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीं 19 ऑगस्ट समाजदिन (Samaj Din) म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर आज नाशिक (Nashik) शहरात मविप्र संस्थेच्या अनेक (MVP Collage) शाळा, महाविद्यालयात समाज दिन साजरा करण्यात येत आहे. याच निमित्ताने मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मखमलाबाद शाळेच्या प्रांगणात पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. छगन भुजबळ म्हणाले की, समाजाच्या विकासासाठी शिक्षण हे अतिशय महत्वाचे असून शिक्षणाच्या प्रश्नावर सर्वांनी जातिभेद, मतभेद दूर करत सर्व समाजाने एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी योगदान देणारे सर्व महापुरुष आपल्या सर्वांची दैवत असली पाहिजे, असे सांगत आपण कुठेही गेलो तरी त्यांचे विचार कदापिही सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, महात्मा फुले (Mahatma Fule) आणि सावित्रीबाई फुले यांनी दिलेला सत्यशोधक समाजाचे विचार रुजवण्यासाठी अनेक कार्यकर्ते निर्माण झाले. त्यांनी समाजात हे विचार रुजवले आजही त्या विचारांवर संस्थांचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. बहुजन समाजाला शिक्षण मिळण्यासाठी महात्मा फुले यांनी वाचा फोडली. पुढे छत्रपती राजर्षी शाहू महाराज (Shahu Maharaj यांनी शिक्षण मिळून देण्याचं काम केलं. त्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, इंदूरचे होळकर, धार संस्थानचे श्रीमंत उदाजी पवार महाराज आदींनी सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाची आवश्यकता विशद करून कृतिशील पावले टाकली असल्याचे त्यांनी सांगितले.

मविप्र संस्थेचा समाजदिन उत्साहात 

मविप्र संस्थेत कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जन्मदिनानिमित्त 19 ऑगस्ट 1982 पासून समाजदिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. त्या पार्श्वभूमीवर आज नाशिक येथील मविप्र संस्थेमार्फत समाजदिन साजरा करण्यात येत आहे. आजच्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी उपस्थिती दर्शवत महापुरुषांना अभिवादन केले. ते म्हणाले, या महापुरुषांच्या विचारांतून प्रेरणा घेत जनतेचे कल्याण आणि आनंदासाठी सामाजिक हेतू जागृत करण्याचे कार्य डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकीतून कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर डी. आर. भोसले, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे, कर्मवीर गणपतदादा मोरे आदी समाजधुरिणांनी 1914 मध्ये मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. शेतकरी, आदिवासी, बहुजन समाजाला शिक्षित करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. अनेकांच्या समर्पण, त्याग व योगदानातून ही संस्था यशोशिखरावर गेली असल्याचे सांगत त्यांना अभिवादन केले.

इतर महत्त्वाची बातमी : 

Chhagan Bhujbal : ‘हरी तुला आम्ही मरू देणार नाही, तू सुरु केलेलं....'  श्रद्धांजली सभेत मंत्री छगन भुजबळांच्या अश्रूंचा बांध फुटला! 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi Speech Nashik | विकसित भारतासाठी नाशिकचा आशीर्वाद घ्यायला आलोय, मोदींनी नाशिकची सभा गाजवलीRaj Thackeray Ratnagiri Speech : एकदा सत्ता द्या.. केरळ, गोव्याला मागे टाकू; राज ठाकरेंचं आश्वासनUddhav Thackeray Speech | नाला&%$ एकही मत पडायला नको; गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजलेABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Embed widget