एक्स्प्लोर
संघर्षयात्रेत नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
सावर्डे (रत्नागिरी): 'शिवसेना राजीनामे देऊन सरकारमधून बाहेर पडणार नाहीत. हे सर्व डरपोक आहेत.' अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. संघर्ष यात्रेत सहभागी झालेल्या राणेंनी रत्नागिरीमधील सावर्डेतील सभेत सरकारवर टीकास्त्र सोडलं.
विरोधकांच्या चौथ्या टप्प्याच्या संघर्षयात्रेला सुरुवात झाली आहे. स्वराज्याची राजधानी रायगडावरुन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या संघर्षयात्रेला सुरुवात झाली. तसंच महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्यालाही यावेळी भेट देण्यात आली.
विशेष म्हणजे संघर्ष यात्रेवर टीका करणारे काँग्रेसचे नेते नारायण राणेही संघर्ष यात्रेत सहभागी झाले आहेत.
'आमदारांचा उद्धव ठाकरेंवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे कोणीही राजीनामा देणार नाही. उलट यांचेच नेते कामं करुन घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भोवती फिरतात.' अशी टीका राणेंनी शिवसेनेवर केली.
'जोवर शिवसेनेला तडीपार करणार नाही तोवर रत्नागिरीचा विकास होणार नाही. त्यामुळे यात्रा जरी संपली तरी संघर्ष संपणार नाही.' अंसही राणे म्हणाले.
'सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं असतं तर ही वेळ आली नसती. विरोधकांनी आंदोलनं केली की त्याची चेष्टा करावी. एवढंच एक काम ते करतात.' असं म्हणत राणेंनी भाजपवरही टीकेचे बाण सोडले.
संबंधित बातम्या:
संघर्षयात्रेच्या चौथ्या टप्प्यात नारायण राणे सहभागी होणार!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement