एक्स्प्लोर

Nanded News : मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने चिरडलं, उपचारादरम्यान मृत्यू

Nanded News : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 24 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने चिरडलं होतं. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नांदेड : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने चिरडल्याने एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील लोहा इथे कंधार रोडवर ही घटना घडली. 30 एप्रिल रोजी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 24 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने चिरडलं होतं. त्याला उपचारासाठी नांदेड इथल्या खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र आज (4 मे) सकाळी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात त्याचे निधन झालं.

दरम्यान संबंधित विद्यार्थ्याला उडवणाऱ्या  टिप्परचा शोध पोलिसांना अद्याप लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. नातेवाईकांनी या तरुणाचा मृतदेह लोहा तहसील कार्यालयात ठेवला. आरोपीला पकडल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.

बसवराज शिवराज सोनवळे असं मृत तरुणाचं नाव आहे. बसवराज हा बीएस्सी (मॅथ्स) सेंकड इयरमध्ये शिक्षण घेत होता. लोहा इथले शिक्षक शिवराज दिंगबर सोनवळे यांचा तो मुलगा होता. कंधार रोडवर दररोज मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिक मॉर्निंग वॉकसाठी जातात. बसव राज हा महाविद्यालयीन तरुणही नित्यनियमाने मॉर्निंग वॉकसाठी जात असे. मात्र 30 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तो कंधार रोडवर एका बाजूने जात असताना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने त्याला उडवलं.

ही घटना तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी पाहिली आणि तातडीने त्याच्या मदतीसाठी धावून आले. कुटुंबियांना संबंधित घटनेची माहिती देऊन रुग्णालयात दाखल केलं. तोपर्यंत टिप्पर चालक घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेत बसवराज याच्या मांडीला जबर मार लागला होता. नांदेड इथे एका खाजगी रुग्णालयात सायंकाळी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, पण आज अखेर त्याची प्राणज्योत मालवली.

इतर महत्त्वाच्या बातम्या

नांदेड जिल्ह्यात वाळू माफियांचा माजी सरपंच पितापुत्रावर प्राणघातक हल्ला

Beed: वाळू उपशामुळे खड्डा झालेल्या पाण्यात बुडून चार मुलांचा दुर्देवी मृत्यू

Parbhani Crime : वाळू माफियांकडून शेतकऱ्याचा खून, 8 दिवस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, स्वतः पोलीस अधीक्षकांनी गुन्हा नोंदवून घेतला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah :  जसप्रीत बुमराहचा सन्मान, 2024 च्या ऑस्ट्रेलियनं XI च्या कॅप्टनपदी निवड, दमदार कामगिरीची अनोखी दखल
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केला जसप्रीत बुमराहचा अनोखा सन्मान, यशस्वी जयस्वालला देखील मानाचं स्थान
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
Kerala Nurse Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 01 January 2025Vinod Kambli Plays Cricket : भारताची जर्सी, हातात क्रिकेट बॅट; हॉस्पिटलमध्ये कांबळीचे चौकार-षटकार!Vinod Kambli Discharged : भारताची जर्सी, डोळ्यावर गॉगल आणि हाती बॅट; विनोद कांबळीला डिस्चार्ज!Jitendra Awhad on Beed Crime : बीड प्रकरणातील आका म्हणजे मुंडे! जितेंद्र आव्हाड आता स्पष्टच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah :  जसप्रीत बुमराहचा सन्मान, 2024 च्या ऑस्ट्रेलियनं XI च्या कॅप्टनपदी निवड, दमदार कामगिरीची अनोखी दखल
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केला जसप्रीत बुमराहचा अनोखा सन्मान, यशस्वी जयस्वालला देखील मानाचं स्थान
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
Kerala Nurse Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
Milind Narvekar : अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
Gold Rate : नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश
महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश
Embed widget