एक्स्प्लोर

महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश

मंत्री आशिष शेलार यांनी विभागाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीविषयी मार्गदर्शन करताना म्हटले की, एआय तंत्रज्ञानाचं युग सुरू झाले आहे.

मुंबईसध्याच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आता सॉफ्टवेअर आणि एआयचा काळ सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. आयटी क्षेत्र ज्या झपाट्याने वाढलं, त्याच झपाट्याने आता या क्षेत्रात क्रांती होताना दिसून येते. त्यामध्ये डिजिटलायजेशनंतर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे यासाठी राज्याचे पहिले, एआय (AI) (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरण तयार करा, असे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज विभागाला दिले. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळतील व तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेल असे त्यांनी यावेळी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहावर आज माहिती व तंत्रज्ञान विभागाचा मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आढावा घेतला. या बैठकीस आयटी विभागाचे सचिव पराग जैन नैनुटिया, महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री आशिष शेलार यांनी विभागाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीविषयी मार्गदर्शन करताना म्हटले की, एआय तंत्रज्ञानाचं युग सुरू झाले आहे. महाराष्ट्राने या क्षेत्रात आघाडी घेतली पाहिजे. एआयचा प्रभावी उपयोग करून आपण अधिक उद्योग व व्यवसाय आकर्षित करीत तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राचे स्थान भक्कम करण्याची ही संधी आहे. मार्च 2024 मध्ये सुरू करण्यात आलेल्या 'इंडिया एआय मिशन' अंतर्गत देशभरात एआय क्षमता वाढवण्यासाठी ₹10,372 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात इंडिया एआय डेटासेट्स प्लॅटफॉर्म, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट प्रकल्प, ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स, इंडिया एआय इनोव्हेशन सेंटर, फ्युचर स्किल्स प्रोग्राम आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी वित्तपुरवठा यांचा समावेश आहे.

AI मध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहावा

दरम्यान, केंद्र सरकार जानेवारी 2025 पासून वैयक्तिक नसलेल्या डेटासेट्सचे संकलन सुरू करणार आहे. त्यामुळे स्टार्टअप्स, कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि संशोधका ॲप्स विकसित करण्यासाठी, विविध भाषांची सेवा देण्यासाठी तसेच  आणि विशेष सेवा देण्यासाठी उपयोग होणार आहे. आपला देश तंत्रज्ञानाच्या आघाडीवर प्रगती करत असताना महाराष्ट्र यात अग्रेसर राहिला पाहिजे असेही अ‍ॅड. शेलार यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील बारामतीमध्ये एआयवर विकसित शेतीचा प्रयोग करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, एआय हे तंत्रज्ञान वापरुन विविध क्षेत्रात बदल व क्रांती घडविली जाऊ शकते.

हेही वाचा

76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्र्यांचाही लाल परीतून प्रवास

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget