एक्स्प्लोर

नांदेडमधील भाजपचे एकमेव आमदार शिवसेनेच्या वाटेवर?

नांदेडमधील भारतीय जनता पक्षाचे एकमेव आमदार शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे.

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुखेड हा एकमेव मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. 2015 साली झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे डॉ. तुषार राठोड हे 47 हजार 248 मतांनी विजयी झाले होते. आमदार तुषार राठोड यांनी काँग्रेसच्या हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांचा पराभव केला होता. 1 ऑगस्ट 2019 ते 2 ऑगस्ट 2019 दरम्यान युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने नांदेड जिल्हा दौऱ्यावर होते. 2 ऑगस्ट रोजी सकाळी शासकीय विश्रामगृहात भाजपचे जिल्ह्यातील विधानसभेचे एकमेव आमदार असलेले डॉ. तुषार राठोड हे शासकीय विश्रामगृहात पोहोचले. विश्रामगृहात पोहोचून आमदार राठोड यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी तिथे माजी पालकमंत्री अर्जुन खोतकर, हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, देगलूर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे हेदेखील उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, विधानपरिषद सदस्य तथा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर ही मंडळीदेखील नांदेड शहरात राहतात. परंतु यापैकी कोणीही आदित्य ठाकरे यांच्या स्वागताला गेले नाही. एकटे आमदार राठोड आदित्य ठाकरेंना भेटायला गेले होते. एरवी कोणत्याही स्वपक्षाचे तसेच इतर पक्षाच्या नेत्याच्या भेटीपासून, सभेपासून दूर असणाऱ्या तुषार राठोड यांनी अचानक आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. सध्या सुरु असलेले मुखेड मतदार संघातील नाराजीनाट्य, उमेदवार बदलाचे वारे आणि मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या नावाची चर्चा पाहून तुषार राठोड सेनेच्या वाटेवर आहेत की काय अशी चर्चा जोर धरत आहे. मुखेड विधानसभा मतदारसंघ | भाजप-काँग्रेसमध्ये सरळ लढत, जातीय समीकरणं महत्वाची नुकतेच राज्य संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्यासोबतच्या बैठकीला दुपारची 2 ची वेळ असताना आमदार तुषार राठोड हे दुपारी 4 वाजता बैठकीच्या ठिकाणी पोहोचले, अशी चर्चा आहे. त्यामुळेच राज्य संघटन मंत्र्यांच्या बैठकीला उशिरा जाणारे आमदार तुषार राठोड आदित्य ठाकरेंना वेळ काढून भेटायला गेले. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही सदिच्छा भेट : आमदार तुषार राठोड 2 ऑगस्ट रोजी मी आदित्य ठाकरे यांच्या भेटीला शासकीय विश्रामगृह येथे गेलो होतो, पण ही भेट सदिच्छा भेट होती, अशी प्रतिक्रिया आमदार डॉ. तुषार राठोड यांनी एबीपी माझाला दिली. शिवसेना-भाजप युती आहे आणि आदित्य ठाकरे हे नांदेड शहरात आले आहेत याची माहिती मिळाल्याने मी केवळ त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी गेलो होतो, असेही त्यांनी सांगितले. आगामी निवडणूक, युती होणार कि नाही? कोणाला तिकीट मिळणार? याबाबत कट्ट्या-कट्ट्यावर चर्चा होत आहेत. इतक्या हॉट राजकीय स्थितीत सहजासहजी कोणत्याही पक्षाचा आमदार पदाधिकारी अन्य पक्षाच्या नेत्याला भेटत नाही. एका पक्षाचा माणूस दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला भेटला की पक्षबदलाच्या चर्चा सुरु होतात. त्यामुळे अशी रिस्क पक्षबदल करण्याच्या मानसिकतेत असलेला कोणीही घेणार नाही. त्यामुळेच भाजपचे मुखेड विधानसभेचे आमदार आगामी निवडणुकीत भाजपला रामराम करुन शिवसैनिक होतात की काय? अशी चर्चा होऊ लागली आहे.  नांदेडच्या माहूरमध्ये काहूर; 1 हजार 900 एकर जमिनीवर राजघराण्याचा दावा | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget