एक्स्प्लोर

Nana Patole on Maharashtra CM : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? नाना पटोलेंनी एका वाक्यात नाव सांगितलं!  

Nana Patole on Maharashtra CM : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे नंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा मुख्यमंत्रीपदावरून एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

Nana Patole मुंबई : गेल्या लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीने (MVA) आता विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) साठी रणशिंग फुंकलंय. महाविकास आघाडीने आज मुंबईत एकत्र मेळावा घेत, विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा केलीय.  महाविकस आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून मविआमध्ये आणि राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा आणि नावं पुढे येत होती. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी पहिलं भाषण करून आज मोठी घोषणाच केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा मी पाठींबा देतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मविआ म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याचा एकप्रकारे निर्धार केलाय. सोबतच या चर्चांना अंशत: पूर्णविराम मिळाला आहे. तर त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (Nana Patole on Maharashtra CM) सुद्धा मुख्यमंत्रीपदावरून एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.   

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?

उद्धव ठाकरे यांनी पहिलं भाषण करून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावर महत्वाचे भाष्य केलंय. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, उद्धव ठाकरे  यांनी मुद्दामून हा प्रश्न टाकलाय. त्यांच्या माध्यमातून आता हा विषय चर्चेत राहील, पण मुख्यमंत्री चेहरा कोण असेल हे जेष्ठ नेते मिळून ठरवतील आणि अंतिम निर्णय घेतील. असे म्हणत नाना पटोलेंनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे एका वाक्यात सांगितलंय. 

अजूनही त्यांचा घमंड उतरला नाही

भ्रष्ट सरकारच्या विरोधात आज आपण प्रचाराचा नारळ फोडून महाविकास आघाडी म्हणून प्रचाराला सुरुवात करत आहोत. हे सरकार घाबरलेलं सरकार आहे. रोज नवीन जीआर काढण्याचा प्रयत्न ते करत आहेत. काल, 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनी लाल किल्यावर पंतप्रधान मोदी यांनी भाषण केलं ते मी ऐकत होता. यावेळी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना जे स्थान तिथे द्यायला हवं होतं ते दिल्या गेलं  नाही. हा एक प्रकारे द्वेष होता आणि हा लोकशाही वरचा हल्ला आहे. लोकशाहीचा तो खून होता. अजूनही त्यांचा घमंड उतरला नाही. अशा शब्दात  नाना पटोलेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

दिल्लीत बसलेल्या दोन नेत्यांचे एटीएम महाराष्ट्र- नाना पटोले 

दिल्लीत बसलेल्या दोन नेत्यांचे एटीएम महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रला कंगाल करण्याचा काम हे करताय. आता यांचा हे  एटीएम आपल्याला बंद करायचा आहे. तर सुप्रीम कोर्टाने सरकारला झोडपलंय, त्यात त्यांनी म्हटलं आहे की, तुम्हाला शेतकऱ्यांना  द्यायला पैसा नाही आणि तुम्ही योजना आणताय. नोकरभरती करणार नाही, असा सरकार ने ठरवलंय. मला शंका आहे की या लाडक्या बहिणीकडून हे पैसे वसूल करू शकतात. तुम्ही या योजनेत बसत नाही म्हणून पैसे परत द्या, असा सुद्धा हे सांगून पैसे परत घेऊ शकतात. आमच्या सरकाराच्या पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही केली होती. मात्र हे सरकार आज शेतकऱ्यांची लूट करत असल्याची टीकाही नाना पटोलेंनी सरकारवर केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Port Blair Renamed Sri Vijaya Puram : देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता 'विजयपूरम'
देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता 'विजयपूरम'
Bangladesh Crisis : रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेशात काय घडतंय?
रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेशात काय घडतंय?
विधानसभेचा बिगुल वाजणार, मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणा लागल्या कामाला
विधानसभेचा बिगुल वाजणार, मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणा लागल्या कामाला
लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सEknath Khadse : मुलीशी चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप माझ्याकडे होती : खडसेMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 13 Sep 2024Eknath Khadse Majha Katta: भाजप की राष्ट्रवादी? एकनाथ खडसे यांचे 'माझा कट्टा'वर खळबळजनक गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Port Blair Renamed Sri Vijaya Puram : देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता 'विजयपूरम'
देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता 'विजयपूरम'
Bangladesh Crisis : रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेशात काय घडतंय?
रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेशात काय घडतंय?
विधानसभेचा बिगुल वाजणार, मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणा लागल्या कामाला
विधानसभेचा बिगुल वाजणार, मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणा लागल्या कामाला
लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
Vande Bharat Express In Kolhapur : कोल्हापूर, सांगलीसाठी अखेर वंदे भारत मिळाली; 16 सप्टेंबरपासून धावणार, कसं असेल वेळापत्रक?
कोल्हापूर, सांगलीसाठी अखेर वंदे भारत मिळाली; 16 सप्टेंबरपासून धावणार, कसं असेल वेळापत्रक?
Eknath Khadse on Majha Katta : एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
Manoj Jarange : 'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी'; मनोज जरांगे पाटलांचं जोरदार टीकास्त्र
'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी'; मनोज जरांगे पाटलांचं जोरदार टीकास्त्र
नागपूर हिट अँड रन, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले, पण...; भुवया उंचावणारे दृश्य
नागपूर हिट अँड रन, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले, पण...; भुवया उंचावणारे दृश्य
Embed widget