एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

वोट जिहादच्या जीवावर तुमच्या उमेदवारांचा विजय, मात्र तुमचा मोठा वैचारिक पराभव; भाजप प्रवक्त्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात 

Keshav Upadhye : मविआने आज मुंबईत एकत्र मेळावा घेत, विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा केलीय. अशातच याच मुद्द्यावरुन भाजप चे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. 

Keshav Upadhye मुंबई : महाविकस आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यावरुन अनेक चर्चा आणि नावं पुढे येत असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांनी पहिलं भाषण करत मोठी घोषणा केली आहे. पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा मी पाठींबा देतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मविआ म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याचा एकप्रकारे निर्धार केलाय. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीने (MVA) आता विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) साठी रणशिंग फुंकलं. महाविकास आघाडीने आज मुंबईत एकत्र मेळावा घेत, विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा केलीय. अशातच याच मुद्द्यावरुन भाजप चे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. 

तुमच्या उमेदवारांचा विजय, मात्र, तुमचा खूप मोठा वैचारिक पराभव

मुख्यमंत्री पदासाठी कोणाचेही नाव जाहीर करा उध्दव ठाकरेचा पाठिंबा असेल, असे उध्दव ठाकरे म्हणालेत. यावरुन बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, अहो उध्दव ठाकरे, वोट जिहाद च्या जीवावर निवडून आलेल्या तुमच्या उमेदवारांचा विजय, हा तुमचा खूप मोठा वैचारिक पराभव आहे. जस लिंबू चमचाच्या शर्यतीत लिंबू पडल्यावर पहिला येऊनही काही उपयोग नसतो, तसंच तुमचं झालं आहे. विचारधारा कधीच सोडली आणि या बदल्यात तुम्हाला मिळालं काय ? अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि महाराष्ट्राला मिळालं काय? अडीच वर्षांची विचारहीन, जुलमी, घोटाळेबाज आणि वसुलीबाज राजवट. अशा शब्दात  भाजपच्या प्रवक्त्यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केलाय. त्यांनी एक्सवर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.   

दिल्लीला जाऊन मुख्यमंत्री पदासाठी लोटांगण

विचारधारा तर आधीच गमावली होती, पण शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचं पाणी करून उभा केलेला पक्ष तुम्ही अहंकारामुळे फोडला. बाळासाहेबांचे खरे वैचारिक वारसदार कार्यकर्ते तुमच्या पासून दुरावले आणि एवढं सगळं करूनही दिल्लीला जाऊन मुख्यमंत्री पदासाठी लोटांगण घालूनही महाविकास आघाडीने न बोलता तुमचे मुख्यमंत्रीपद डावलले आहे. पण तुमची अवस्था एवढी दयनीय झाली आहे, की आज तुम्हाला मुख्यमंत्री कोणीही झाला तरी पाठिंबा देतो, असे म्हणायची वेळ आली असल्याची टीका ही  भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Embed widget