महाविकास आघाडी आज फोडणार प्रचाराचा नारळ, मुंबईत षण्मुखानंद सभागृहात मेळावा
Maharashtra Breaking 16th August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
मुंबई : महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे... मुंबईत आज सकाळी साडेदहा वाजता षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे...उद्धव ठाकरे,शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील राज्यातील सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत....महाविकास आघाडीतील प्रमुख नेते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांना या मेळाव्यात मार्गदर्शन करतील आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टिकोनातून रणनीती या मेळाव्यात ठरवली जाईल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा हा पहिलाच संयुक्त मेळावा पार पडणार आहे.
Jayant Patil : मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीमध्ये सही करण्यावरून काहीतरी झालं... जयंत पाटलांची चर्चा
Jayant Patil : लोकसभेत मुंबईत एक जागा चोरली, महाराष्ट्रमध्ये 31 जागामध्ये भाजपला नाकारलेला आहे. ते घाबरलेले आहे आणि घाबरलेला माणूस काहीही करू शकतो. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीमध्ये सही करण्यावरून काहीतरी झालं. ते म्हणताय आतापर्यंत आम्ही बघून सह्या केल्या का? म्हणजे आतापर्यंत न बघता सह्या केल्या आहेत . शरद पवार म्हणतात जो प्रमुख असतो तोचं आधी बोलतो, अशी दक्षिणेकडची पद्धत आहे , असेही जयंत पाटील म्हणाले.
Jayant Patil : भाजपच्या काही नेत्यांनी जमिनी ढापल्या आहेत : जयंत पाटील
Jayant Patil : दिल्लीतील सरकार कधी खाली येईल याचा नेम नाही. ईव्हीएम मशीनवर आता लक्ष ठेवा. महाराष्ट्रात हिंदू देवस्थानच्या जमिनी विकण्याचं पाप भाजप करतय. भाजपच्या काही नेत्यांनी जमिनी ढापल्या आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.





















