Nagpur News : सुरतच्या धर्तीवर ट्राफिक व्यवस्था 'एनजीओ' कडे? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
Nagpur : सुरतमध्ये ट्राफिक व्यवस्था ही एनजीओ सांभाळते. त्याप्रमाणे एक टीम जाऊन या सर्व व्यवस्थेचे अध्ययन करेल आणि त्यानंतर त्याचा अवलंब करू, असे मत मंत्री नितीन गडकरी यांनी बोलताना व्यक्त केले आहे.
Nagpur News नागपूर : सुरतमध्ये ट्राफिक व्यवस्था (Traffic management) ही एनजीओ सांभाळते. त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एक टीम जाऊन या सर्व व्यवस्थेचे अध्ययन करेल आणि त्यानंतर त्याचा अवलंब इतर शहरात करू, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बोलताना व्यक्त केले आहे. नागपूर शहरात (Nagpur News) रस्ते अपघात कमी करण्यासंदर्भात अपघात निवारण समितीची बैठक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडली. यात शहरात होत असलेल्या हिट अँड रनच्या घटना असो, की ब्लॅक स्पॉटमुळे होणारे अपघात, हे रोखण्यासाठी उपाययोजनेच्या संदर्भात ही बैठक पार पडली. रविभवन येथील बैठकीत संबंधित उच्च पदस्थ अधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह आरोग्य विभाग, नागपूरात वाहतूक जनजागृतीसाठी काम करणाऱ्या एनजीओचा सहभाग होता. यावेळी मंत्री नितीन गडकरी बोलत होते.
देशात दरवर्षी 5 लाख लोकांचा रस्ते अपघात मृत्यू
नागपुरात 800 ते 1000 लोकांचा दरवर्षी अपघातात मृत्यू होतो. देशात दरवर्षी 5 लाख लोकांचा रस्ते अपघात मृत्यू होतो. या अपघातात मृत्यमुखी होणारे 65% मृतक हे 18 ते 34 वयोगटातील आहे. परिणामी, नागपूर शहरात होणारे अपघात आणि या अपघतांसाठी कारण ठरलेले ब्लॅक स्पॉट शोधले आहेत. तसेच त्यावर सध्या काम सुरू असल्याच समाधान केंद्रीय वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
फुटपाथवरील अतिक्रमणवर कठोर कारवाई
या सोबतच शाळेसमोरील होणारे अपघात रोखण्यासाठीही काम सुरू असल्याचेही गडकरी म्हणाले. तर अतिक्रमणामुळे पायदळ चालणाऱ्यासोबत हिट अँड रन मध्ये मृत्यूचा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे फुटपाथवरील अतिक्रमणवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. जेव्हा कार आणि बस सारख्या वाहनांचा अपघात झाल्यास लोकांना वाहनचे पार्ट कापून काढावं लागतात. त्यासाठी अद्यावत वाहन जे अश्या ठिकाणी मदत पोहचवू शकेल. सोबतच मोठ्या अपघाताच्या घटनेत रुग्णवाहिकेसह सोबत डॉक्टरच पथक जाऊन कसे पोहचवता येईल, यावरही या बैठकीत चर्चा झाली. सुरतमध्ये ट्राफिक व्यवस्था ही एनजीओ सांभाळते. त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एक टीम जाऊन या सर्व व्यवस्थेचे अध्ययन करेल आणि त्यानंतर त्याचा अवलंब करू, असेही नितीन गडकरी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या