Kolhapur News : चोरट्यांचा कहरच! चक्क पोलीस मुख्यालयातून पोलिसांची दुचाकी लंपास, कोल्हापुरातील प्रकार
कोल्हापुरात चोरांचा सुळसुळाट इतका वाढलेला पाहायला मिळत आहे की, आता या चोरट्यांचे धाडस थेट पोलिसांच्या गाड्या चोरण्यापर्यंत पोहोचले आहे. असाच एक धक्कादायक प्रकार कोल्हापूर पोलीस मुख्यालयासमोर घडलाय.
Kolhapur News : कोल्हापूरसह जिल्हाभरामध्ये वाहन चोरीच्या (Crime) घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. चोरांचा सुळसुळाट इतका वाढलेला पाहायला मिळत आहे की, आता या चोरट्यांनी थेट पोलिसांच्या गाड्या चोरण्यापर्यंत धाडस पोहोचले आहे. कोल्हापूरातल्या पोलीस मुख्यालयातून एका पोलीस कर्मचार्याचीच दुचाकी चोरट्यानी लंपास केली आहे. विशेष म्हणजे भर दुपारी हा चोरीचा प्रकार घडलाय. कोंस्टेबल सुभाष गवळी यांची ही गाडी चोरीला गेलीये. या चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली आहे.
वाढती गुन्हेगारी आणि चोरीच्या घटना आपण नेहमी ऐकत आणि वाचत असतो. मात्र या चोरट्यांचे धाडस इतके वाढले आहे की त्यांनी चक्क पोलीस मुख्यालयातील वाहनांना लक्ष केलं आहे. असाच एक धक्कादायक प्रकार कोल्हापूर पोलीस मुख्यालयातून समोर आला आहे. यात एका चोरट्याने कोंस्टेबल सुभाष गवळी यांची दुचाकी लंपास केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही चोरीची घटना गुरुवारी दिवसाढवळ्या घडली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा शोध घेत असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जालना -चोरीच्या 13 मोटरसायकल जप्त, एका आरोपीला अटक
अशीच एक चोरीची घटना जालना पोलिसांनी उघड केली आहे. जालन्यातली अंबड पोलिसांनी मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केलेल्या 13 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. अंबड शहरांमध्ये चोरीची मोटरसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपीला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच्या कडे चोरीच्या दुचाकी आढळून आल्या. पोलिसांनी या प्रकरणी एक जणाला बेड्या ठोकल्या असून या प्रकरणात इतर आरोपी असल्याचा पोलिसांना संशय आहे. तर दोन दिवसापूर्वीच जालना पोलिसांनी चोरीच्या तब्बल 16 मोटरसायकल जप्त केल्या होत्या. गेल्या काही महिन्यात दुचाकी चोरांनी पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं केलंय. परिणामी पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळत ही कारवाई केली आहे.
चोरीच्या तब्बल 23 दुचाकीसह अखेर 'त्या' टोळीचा पर्दाफाश
वर्ध्याच्या आर्वी पोलिसांनीही अशीच एक कारवाई करत तब्बल 23 दुचाकीसह चोरी करणारी एक टोळी जेरबंद केली होती. यात आर्वी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन दुचाकी चोरीच्या घटनेचा तपास आर्वी पोलिसांकडून सुरु होता. अशातच धानोडी येथे चोरीची दुचाकी विक्रीकरिता एक युवक येत असल्याची माहिती आर्वी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकला मिळाली. यावरून पोलिसांनी सपाळा रचत नयन मिलिंद गायकवाड (वय 19 वर्ष रा. कोसूर्ला) याला दुचाकीसह अटक केलीय.
संशयित आरोपीला अटक करत तपास केला असता संशयित आरोपीने वर्धा जिल्ह्याच्या आर्वी, सेवाग्राम, सावंगी, अल्लीपूर, खरागणा, सेलू येथील दुचाकी चोरल्याची कबुली दिलीय. दुचाकी चोरताना संशयित आरोपी नयन सोबत वर्ध्याच्या येसंबा येथील साहिल डोंगरे आणि दोन विधीसंघर्षित बालक मदत करत होते. हे सर्व दुचाकी चोरून वाशिम येथे जाऊन विक्री करत असल्याच समोर आलंय.
हे ही वाचा