एक्स्प्लोर
नागपुरात शेतकऱ्यांना महाबीजचा शॉक, सोयाबीनचं बियाणं बोगस
नागपूर : अस्मानी संकटानं खचलेल्या शेतकऱ्यांवर आता सुलतानी संकट ओढावलं आहे. मोठ्या अपेक्षेनं चांगल्या उत्पादनाची उमेद ठेऊन शेतात पेरलेल्या बियाण्यांनीच दगा दिला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण काळ्याभोर तीन एकर जमिनीवर शंभर किलो सोयाबीन पेरलं आहे. पण काही अपवाद वगळता एक बी देखील उगवलं नाही.
नागपूर जिल्ह्यातील घोगली गावातील गुणवंत राऊत या शेतकऱ्यासोबत हा प्रकार घडला. उन्नत शेती, समृद्ध शेतकरी या योजनेअंतर्गत त्यांनी महाबीजकडून अनुदानित किमतीवर हे बियाणं खरेदी केलं होतं.
अशी फसगत झालेले गुणवंत राऊत हे एकटे शेतकरी नाहीत. घोगली गाव आणि परिसरात 23 शेतकऱ्यांना याचा फटका बसला. खासकरुन महाबीजच्या सोयाबीनच्या 9560 आणि 9305 या प्रजातीच्या बियाण्यांबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
फसगत झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खाजगी कंपनीचं बियाणं घेऊन दुबार पेरणी केली. पण काही शेतकऱ्यांकडे पैसेच नसल्यानं यंदा जमीन पडीक ठेवण्याची वेळ आली आहे.
महाबीजनंही शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्याची कबुली दिली आहे. खरं तर महाबीज सारख्या
सरकारी कंपनीचं बियाणं असं बोगस निघत असेल तर शेतकऱ्यांनी कुणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे. शिवाय या शेतकऱ्यांच्या फसवणुकीबद्दल त्यांना नुकसान भरपाई मिळायला हवी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement