एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nagpur Lok Sabha Election : नागपूरात नितीन गडकरींच्या प्रचाराचा धुरळा; लोकसंवाद यात्रेतून मतदारांना साद

नागपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आजपासून आपला प्रचार सुरू केला आहे. आज गडकरी यांनी नागपूरात लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून त्यांचा प्रचाराला सुरुवात केलीय.

Lok Sabha 2024 Nagpur : लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha 2024)पडघम वाजाले असून जवळ जवळ सर्वच पक्षानी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. अशातच नागपूर लोकसभा मतदारसंघातून महायुती आणि भाजपचे उमेदवार असलेले विद्यामन खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) आजपासून आपला रीतसर प्रचार सुरू केला आहे. नितीन गडकरी यांनी आज नागपूरात लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून त्यांचा प्रचाराला सुरुवात केली आहे.

मध्य नागपुरातील (Nagpur) भारतमाता चौक या ठिकाणी भारत मातेला वंदन करून गडकरी आज प्रत्यक्षपणे मैदानात उतरले आहेत. या लोकसंवाद यात्रेतून गडकरी मतदारांशी संवाद साधत आपण दहा वर्षांत केलेल्या कामांची माहिती देत आहे. तसंच पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा प्रचंड बहुमतानं निवडून आणण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी मतदारांना केले आहे.

लोकसंवाद यात्रेतून मतदारांना साद

देशभर आपल्या विकासकामामुळे वेगळी छाप निर्माण करणारे केंद्रीय मंत्री आणि विद्यामन खासदार नितीन गडकरी (Nitin Gadkari) सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. नुकतेच त्यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. यावेळी आपण मोठ्या मताधिक्क्याने विजय संपादन करू असा विश्वास गडकारींनी बोलून दाखवला आहे. याच अनुषंगाने आज नितीन गडकरी यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून नागपूरकरांना साद घातली आहे. मध्य नागपुरात आज नितीन गडकरींनी लोकसंवाद यात्रा काढत मतदारांच्या दारपर्यंत जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आज मध्य नागपूरातील राजवाडा पॅलेस जवळील भारत माता चौक या ठिकाणी भारत मातेला वंदन करून गडकरींनी प्रचाराला सुरुवात केलीय.

दरम्यान, मतदारांशी संवाद साधत गडकरींची ही रॅली हळूहळू पुढे सरकतेय. यात छत्रीवाले गणेश मंदिराजवळ परिसरातील महिलांनी गडकरींचं ओवाळून स्वागत केलं. यावेळी उपस्थित जनतेला गडकरींनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांची माहिती दिली, तसंच मोदींना पुन्हा एकदा प्रचंड बहुमतानं निवडून आणण्याचं आवाहन देखील केलं. यावेळी मोठ्यासंख्येने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक या लोकसंवाद यात्रेत सहभागी झाले आहे. 

नागपूरमध्ये कोण बाजी मारणार?

नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांच्या विरोधात महाविकास आघाडीने काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, विकास ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना पूर्ण ताकद पणाला लावत जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे कधीकाळी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला यश येतं का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तर दुसरीकडे नितीन गडकरी हे नागपूरसह देशभरातील मोठं नाव आहे. ते केंद्रात मंत्री असून आपल्या कार्यकाळात त्यांनी नागपूरमध्ये अनेक विकासकामे केल्याचा दावा भाजपकडून केला जातो. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हेदेखील नागपूरमधूनच येतात. त्यामुळे नागपूर ही जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे.

त्यामुळे ही जागा जिंकून भाजपला चितपट करण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी चालू केली आहे. नागपूर काँग्रेसमधील नेते गटतट विसरून कामाला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत विकास ठाकरे यांना निवडून आणायचं, असा विश्वास येथील नेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे नागपूरच्या जागेवर नेमका कोणाचा विजय होणार आहे? काँग्रेस ही जागा खेचून आणणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : दिल्लीत बैठक, खातेवाटपावर चर्चा, देवेंद्र फडणीसांच्या जमेच्या बाजू कोणत्या?Zero Hour Media Center : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ठाकरे स्वबळावर लढतील?Zero Hour Devendra Fadnavis : उद्या दिल्लीत बैठक, भाजपची मोहोर देवेंद्र फडणवीसांवरच?Zero Hour : ठाकरेंच्या पराभूत उमेदवारांचा स्वबळाचा सूर, अंबादास दानवे काय बोलले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget