एक्स्प्लोर

Nagpur Lok Sabha Election : नागपूरात उमेदवारी अर्ज भरण्याआधी नितीन गडकरींचे जोरदार शक्तिप्रदर्शन; विजयाची हॅटट्रिकचा केला निर्धार

काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी काल प्रचंड ताकदीने मैदानात उतरत आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज नितीन गडकरी यांनी देखील त्याच ताकदीने शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Lok Sabha 2024 Nagpur : कधीकाळी काँग्रेसचा (Congress) गड मानल्या जाणाऱ्या उपराजधानी नागपूरात (Nagpur) यंदा काँग्रेसच्या सर्व गटांनी (Nagpur Congress) आपापसातले मतभेत विसरून सर्व गटांनी एकत्रित येत आपली ताकद पणाला लावली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा काँग्रेस विरोधात उभे राहिलेले भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(BJP Candidate Nitin Gadkari)  यांचा पराभव करण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला आहे. 

काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी काल प्रचंड ताकदीने मैदानात उतरत आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपने देखील त्याच तोडीस तोड शक्तिप्रदर्शन करत आज अखेरच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपच्या(BJP) सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. त्यामुळे आता नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप विरुद्ध काँग्रेसमधील ही लढत वाटते तितकी नक्कीच सोपी नसणार, हे यातून सिद्ध झाले आहे.

नागपूरात नितीन गडकारींचे जोरदार शक्तिप्रदर्शन

केंद्रीय मंत्री आणि विद्यामन खासदार नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या पूर्वीच आपला प्रचाराचा नारळ फोडत स्वत: मैदानात उतरल्याचे बघायला मिळाले आहे. ‘कहो दिल से, नितीन गडकरी फिर से’ म्हणत नागपूर भाजपतर्फे नितीन गडकारींना तिसऱ्यांदा खासदार करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यात आता नितीन गडकरी यांनी देखील आपली जोरदार तयारी केल्याचे चित्र आहे. अशातच आज 27 मार्चला गडकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या करिता नागपूर भाजप आणि नितीन गडकरींच्या वतीने संविधान चौक से जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या रॅलीच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी आपले जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.

या करिता स्वत: नितीन गडकारींनी तमाम नागपूरकरांना या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. सोबतच मी कुठलेही वाहन पाठवणार नाही, अशी तंबी देखील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिली होती. असे असताना आज नागपूरच्या संविधान चौकात स्वयमस्फूर्तिने हाजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागपूरकर रस्त्यावर उतरले. यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी (Ramtek Lok Sabha Constituency) महायुतीचे उमेदवार राजू पारवे तर मविआच्या उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) या देखील आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

नागपूरात 75 टक्के मतदान झालं पाहिजे

नितीन गडकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उपस्थितांचे आभार मानत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलतांना नितीन गडकरी म्हणाले की, आज माझ्या दोन टर्मच्या कारकिर्दीत आपण एक लाख कोटींचे काम केलेय. याचे श्रेय केवळ मला किंवा देवेंद्र फडणवीस  यांना देता येणार नाही. तर हे श्रेय तुम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या पाठबळाचे आहे. कारण कार्यकर्त्यांनी जो विश्वास आमच्यावर दाखविला,  म्हणून आम्ही हे काम करू शकल्याचे नितीन गडकरी म्हणाले. या निवडणुकीत मी विजयी होणारच आहे. मात्र माझी विनंती आहे नागपूरात 75 टक्के मतदान झालं पाहिजे. माझा विजय जवळ जवळ पाच लाख मतांनी झाला पाहिजे, असे देखील गडकरी म्हणाले. 

पाच लाख मतांनी आपला विजय 

मी निर्देश दिले होते की कार्यकर्त्यांना आणण्यासाठी बस किंवा गाड्या लावायच्या नाही. असे असतांना देखील आज जवळ जवळ 50 हजार कार्यकर्ते आणि नागपूरकर आपापल्या वाहनांनी आले आहे. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. देशात आपलेच सरकार येणार आणि शिंदे, फडणवीस आणि अजित दादा यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मोठा विकास होईल, असा विश्वास देखील नितीन गडकरी यांनी बोलताना व्यक्त केलाय. 

इतर महत्वाच्या बातमी 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget