एक्स्प्लोर
Advertisement
राज्यातील 147 नगरपालिका निवडणुकांची संपूर्ण आकडेवारी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यात प्रथमच मतदान झालं आहे. 147 नगरपरिषदा आणि 18 नगरपंचायतीसाठी एकूण 165 ठिकाणी मतदान पार पडलं. उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झाल्याने त्यांची धाकधूक वाढली आहे.
आज (28 नोव्हेंबर) या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे कुठला पक्ष या निवडणुकीत बाजी मारतो, हे चित्र स्पष्ट होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत.
यावेळी थेट जनतेमधून नगराध्यक्षाची निवड होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या चुरस रंगली आहे. राज्यातील प्रमुख पक्ष शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा या निवडणुकीमध्ये कस लागणार आहे.
या निवडणुकांकडे मिनी विधानसभा या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. त्यामुळे फडणवीस सरकारचीही चाचणी घेणारी ही निवडणूक मानली जात आहे.
नगरपालिका निवडणुकांची संपूर्ण आकडेवारी :
- थेट नगराध्यक्षपदांच्या जागा- 147
- सदस्यपदांच्या जागा- 3,705
- सदस्यपदांसाठी उमेदवार- 15,826
- बिनविरोध विजयी सदस्य- 28
- थेट नगराध्यक्ष पदांसाठीचे उमेदवार- 1,013
- एकूण प्रभाग- 1,967
- एकूण मतदान केंद्रे- 7,641
- एकूण मतदार- 58,49,171
- पुरुष मतदार- 30,20,683
- स्त्री मतदार- 28,28,263
- इतर मतदार- 225
- रोकड जप्त- 26,04,47,250 रुपये
- अवैध दारु जप्त- 1,24,336 लीटर
- अवैध शस्त्रे जप्त- 9
- आचारसंहिता भंगांच्या तक्रारी- 69
- मालमत्ता विद्रुपीकरण तक्रारी- 30
- संशयित व्यक्तिंविरुद्ध कार्यवाही- 16,810
- शांततेसाठी जामीनपत्रे घेतलेल्या व्यक्ती- 8,741
- प्रतिबंधात्मक कार्यवाही- 3,173
- नाकाबंदी- 4,718
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement