एक्स्प्लोर

मुंबईच्या 2 लाख उत्तरपत्रिका नागपुरात, तासाला 13 पेपर तपासावे लागणार!

मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा घोळ विधानभवनापासून ते राज्यपालांपर्यंत गाजला. त्यानंतर आता मुंबई विद्यापीठाच्या कॉमर्स शाखेच्या लाखो उत्तरपत्रिका तपासणीसाठी नागपूर विद्यापीठात आल्या आहेत.

नागपूर: मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा घोळ विधानभवनापासून ते राज्यपालांपर्यंत गाजला. त्यानंतर आता मुंबई विद्यापीठाच्या कॉमर्स शाखेच्या लाखो उत्तरपत्रिका तपासणीसाठी नागपूर विद्यापीठात आल्या आहेत. सुमारे दोन लाख उत्तरपत्रिका नागपूर विद्यापीठाकडून तपासून दिल्या जाणार आहेत. 250 शिक्षक नागपुरातून ऑनस्क्रीन प्रणालीअंतर्गत मूल्यांकन करुन देणार आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आजच मुंबई विद्यापीठाचे निकाल 31 जुलैपर्यंत लागतील असं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे नागपुरात आलेल्या 2 लाख उत्तरपत्रिका 5 दिवसात तपासण्यासाठी, 250 पैकी प्रत्येक शिक्षकाला तासाला सुमारे 13 उत्तरपत्रिका तपासाव्या लागणार आहेत. शिक्षकांनी जर 12 तास उत्तर पत्रिका तपासणीचं काम केलं तर तासाला 13 पेपर तपासावे लागतील. दरम्यान, नागपूरच्या धनवटे नॅशनल आणि शिवाजी सायन्स या दोन कॉलेजमध्ये सध्या उत्तरपत्रिका तपासणीचं काम सुरु आहे. आजपासून काम सुरु होणं अपेक्षित आहे, मात्र दुपारपर्यंत कॉम्प्युटरवर शिक्षकच दिसत नव्हते. मुंबई विद्यापीठाच्या निकालाला भलेही नागपूर विद्यापीठाची मदत घेतली असली, तरी टार्गेट सोपं नाही. पेपर तपासण्यासाठी सर्व शिक्षक दुपारनंतर येणार. त्यात त्यांना ऑनस्क्रीन प्रणालीची सवय नाही, तिची सवय होण्यास काही दिवस लागू शकतात. त्यामुळे मुंबई विद्यापीठाचे निकाल 31 जुलैला कसे लागणार हे पाहाणं औत्सुक्याचं आहे. 31 जुलैपूर्वीच मुंबई विद्यापीठाचे निकाल, तावडेंचं आश्वासन  मुंबई विद्यापीठातील घोळावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मौन सोडलं आहे. विधानपरिषदेत उपस्थित लक्षवेधीला उत्तर देताना राज्यपालांच्या निर्देशानुसार 31 जुलैपूर्वीच निकाल लावण्याचं आश्वासन तावडेंनी दिलं. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ न देण्याची हमी विनोद तावडेंनी दिली आहे. कुलसचिवांची बदली राज्य सरकारने नाही, तर केंद्राने केल्याची माहिती विनोद तावडेंनी दिली. आर्ट्सचे निकाल परवापर्यंत लागतील. 61 हजार 992 पेपर तपासायचे बाकी आहेत. कॉमर्सचे पेपर तपासणं कठीण आहे. 3 लाख 75 हजार पेपर बाकी असून दरदिवशी 75 हजार तपासायचं आवाहन आहे.  लॉ विषयाच्या  40 हजार उत्तरपत्रिका असून लॉ आणि मॅनेजमेंटला शिक्षक मिळत नसल्याचंही तावडे म्हणाले. एकूण उत्तरपत्रिका – 17 लाख 68 हजार 441 तपासलेल्या उत्तरपत्रिका – 12 लाख 48 हजार 492 तपासण्यास बाकी – 5 लाख 19 हजार 949 मुंबई विद्यापीठात मंगळवारच्या दिवसात 1 लाख 30 हजार पेपर तपासून झाले, 5 हजार 30 शिक्षकांकडून पेपर चेकिंग झाल्याची माहिती आहे. मुंबई विद्यापीठा अंतर्गत 1984 मध्ये 80 महाविद्यालयं होती. तेव्हा परीक्षा विभाग जेवढा होता, तितकाच अजूनही आहे. मात्र 31 जुलैपर्यंत सर्व निकाल लावण्याची जबाबदारी शासन म्हणून स्वीकारतो, असं तावडे म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget