एक्स्प्लोर
मुंबई विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर, 20 ऑगस्टपासून आचारसंहिता लागू होणार
या वेळापत्रकानुसार 30 ऑगस्ट रोजी महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेची निवडणूक तर 24 सप्टेंबरला विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूक होणार आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या वेळापत्रकानुसार 30 ऑगस्ट रोजी महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेची निवडणूक तर 24 सप्टेंबरला विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणूक कार्यक्रमाला 20 ऑगस्टपासून सुरुवात होणार असून 20 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर दरम्यान आचारसंहिता लागू केली जाणार आहे.
कसे आणि कधी होणार महाविद्यालयीन विद्यार्थी परिषेदेचे मतदान?
महाविद्यालय आणि विद्यापीठ विभागात शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा मतदार असणार आहे. हा मतदार सुरवातीला होणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद निवडणुकीत आपल्या वर्ग प्रतिनिधी, महाविद्यालयीन अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी आणि मागास प्रवर्ग प्रतिनिधी अशा 5 जणांना मत देऊन निवडून देणार आहेत.
या महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेच्या मतदारांची अंतिम यादी 22 ऑगस्ट रोजी आपल्या विभागातील सूचना फलकावर जाहीर केली जाणार आहे.
निवडणूक कार्यक्रम कसा असणार ?
उमेदवाराला वर्ग प्रतिनिधी, अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, मागास प्रवर्ग प्रतिनिधी पदासाठी अर्ज दाखल करण्याची 23 ऑगस्ट 2019 ही अंतिम तारीख असणार आहे. या दिवशी सायंकाळी 4 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.
उमेदवाराला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - 28 ऑगस्ट 2019
महाविद्यालय वर्ग प्रतिनिधी, अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, मागास प्रवर्ग प्रतिनिधी पदासाठी मतदान - 30 ऑगस्ट 2019. या दिवशी सलग 4 तास मतदान (प्राचार्य आपल्या विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार वेळ ठेवणार)
महाविद्यालय वर्ग प्रतिनिधी, अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, मागास प्रवर्ग प्रतिनिधी पदाचा निकाल - 30 ऑगस्ट 2019. या दिवशी निकाल लागणार असून त्याच दिवशी विद्यापीठाच्या पोर्टलवर विजयी उमेदवारांची नावे, माहिती जाहीर केली जाणार आहे.
महाविद्यालयीन परिषदेच्या स्थापनेची घोषणा - 31 ऑगस्ट 2019
या निवडणुकीनंतर महाविद्यालयीन विद्यार्थी परिषेदेतून निवडून आलेले विद्यार्थी हे विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारी साठी पात्र असणार आहेत. शिवाय महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेमधून निवडून आलेले उमेदवार हे विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, मागास प्रवर्ग प्रतिनिधी यांना मतदानाद्वारे निवडून देणार आहेत.
विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणूक कार्यक्रम कसा असणार?
विद्यापीठ विद्यार्थी संघाची अंतिम यादी प्रसिद्ध करणे - 13 सप्टेंबर 2019
विहित नमुन्यामध्ये अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, मागास प्रवर्ग प्रतिनिधी पदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख - 17 सप्टेंबर 2019 सायंकाळी 4 वाजेपर्यंत
नामनिर्देश अर्ज मागे घेण्याची तारीख - 20 सप्टेंबर 2019 दुपारी 2 वाजेपर्यंत
उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध - 20 सप्टेंबर दुपारी 4 नंतर
विद्यापीठ विद्यार्थी परिषद अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, मागास प्रवर्ग प्रतिनिधीपदांसाठी मतदान - 24 सप्टेंबर 2019 सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत (स्थळ - महाविद्यालय/ संस्था )
विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणुकीचा अंतिम निकाल मतमोजणी - 27 सप्टेंबर 2019 सकाळी 10 वाजता
विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेची घोषणा - 30 सप्टेंबर 2019 दुपारी 4 नंतर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
भारत
मुंबई
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
