एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईच्या महापौरांची निवड 8 मार्चलाच होणार
मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौरांची निवड 8 मार्चलाच होणार आहे. 8 मार्च रोजी दुपारी 12 महापौरांची निवड केली जाईल. महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर महापौर निवडणूक तारखेत बदल करण्यात आला.
4 मार्चला महापौरपदाच्या उमेदवारीचा अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर 8 मार्चला म्हणजे महापौरपदाच्या निवडीपूर्वी काही वेळ अर्ज माघारी घेण्याची मुदत असेल.
मुंबई महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर तडकाफडकी महापौरपदाच्या निवडणुकीची तारीख बदलण्यात आली. आधी 9 मार्चला महापौर निवडणार असल्याचे बोलले जात असतानाच अचानक आयुक्तांच्या आदेशानंतर 8 मार्च ही तारीख महापौर निवडीसाठी ठरवण्यात आली.
2012 च्या जुन्या नगरसेवकांची मुदत 8 मार्चलाच संपते आहे.
तांत्रिकदृष्ट्या जुने नगरसेवक पदावर असले, तरी चिटणीस विभागाकडून जुन्या नगरसेवकांना सभागृह बैठकीसाठीचे निमंत्रणच पाठवले जाणार नाही. केवळ 2017 मध्ये निवडून आलेल्या नव्या सदस्यांनाच निमंत्रण पाठवण्यात येणार आहे.
मुदतीपूर्वीच महापौर निवडणूक घेण्याचं कारण काय?
8 मार्चला उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे. या दिवशी जर काँग्रेसने शिवसेनेचा महापौर होण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली, तर याचा परिणाम उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या मतांवर होईल, असा भाजपचा अंदाज आहे. त्यामुळे भाजपकडूनच मुदतीपूर्वीच महापौरपदाची निवडणूक घेण्याची खेळी खेळण्यात आली अशी चर्चा आहे.
एकीकडे शिवसेनेनं सभागृहाची मुदत संपण्यापूर्वीच 8 मार्चला निवडणूक घेण्यावर आक्षेप घेतला आहे. कारण त्यादिवशी निवडणूक घेतल्यास जुने नगरसेवकही महापौरपदासाठी मतदानाचा अधिकार मागू शकतात. त्यामुळे प्रशासकीय पेच निर्माण होऊ शकतो.
मात्र शिवसेनेच्या आक्षेपावर प्रशासनानं मार्ग काढत 8 मार्च रोजी होणाऱ्या महापौर निवडणुकीसाठी जुन्या नगरसेवकांना आमंत्रणच न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेतील पक्षीय बलाबल कसं आहे?
- शिवसेना - 84 + 4 अपक्ष
- भाजप - 82
- काँग्रेस - 31
- राष्ट्रवादी - 9
- मनसे - 7
- MIM - 3
- सपा - 6
- अखिल भारतीय सेना - 1
संबंधित बातमी : महापौर निवडणूक आणि आकड्यांचं गणित
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रीडा
Advertisement