बच्चू कडूंना अटक होणार? कोर्टानं जामीन फेटाळला, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Mla Bacchu Kadu Judicial Custody : माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला आहे. बच्चू कडू यांना कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Mla Bacchu Kadu Judicial Custody : माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला आहे. बच्चू कडू यांना कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुंबईतील गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयानं बुधवारी हा निर्णय दिला. राजकीय आंदोलन प्रकरणी बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
राजकीय आंदोलन प्रकरणी बच्चू कडू यांच्याविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यामुळे ते स्वत: आज गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर झाले होते. आमदार बच्चू कडू यांच्याविरुद्ध राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी दाखल केलेल्या निषेधाच्या गुन्ह्यात गिरगाव न्यायालयात हजर झाले होते. त्यांचा जामीन फेटाळण्यात आला असून न्यायालयाने त्यांना ताब्यात घेण्यात आदेश देत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे बच्चू कडूंना आता तुरुगांत जावे लागणार आहे. दरम्यान, या निर्णयानंतर त्यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केल्याची माहिती आहे. सत्र न्यायालयाच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयानंतरच आमदार बच्चू कडू तुरुंगात जाणार की नाही, याचा निर्णय होणार आहे.
बच्चू कडू यांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आमदार बच्चू कडू हे एम.पी.एस.सी , परीक्षा घेण्यात येणाऱ्या महापोर्टल बंद करण्यासाठी तत्कालीन , पी, प्रदीप .महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान संचालक यांची 26 सप्टेंबर 2018 रोजी मंत्रालय येथे भेट घेतली होती. यावेळी पी प्रदीप आणि आमदार बच्चू कडू यांच्यत वाद झाला होता. तेव्हा , बच्चू कडू यांनी टेबलावरील लॅपटॉप पी प्रदीप यांच्यावर उगारला होता , त्यामुळे मंत्रालय कर्मचारी यांनी उग्र आंदोलन केले होते. तर याप्रकरणी प्रदीप यांनी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. याची सुनावणी गिरगाव न्यायालय चालू होती. मात्र त्या सुनावणीस बच्चू कडू उपस्थित राहत नसल्याने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. यावर आज बच्चू कडू उपस्थित झाल्यावर त्यांना न्यायालयाने जामीन रद्द करत 14 दिवसाची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. यावर बच्चू कडू यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली असून जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यात बच्चू कडू याना जामीन मिळणार की तुरुंगामध्ये जावे लागणार हे स्पष्ट होणार आहे. पण या प्रकरणामुळे बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
हेही वाचा :
Mla Bacchu Kadu Judicial Custody : राजकीय आंदोलन प्रकरणी बच्चू कडूंना न्यायालयीन कोठडी