एक्स्प्लोर

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये मिळवण्यासाठी आधार क्रमांक बँकेशी कसा लिंक करायचा? जाणून घ्या A टू Z प्रक्रिया!

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत केली जात आहे. मात्र बँकेला आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाहीये.

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पैसे पाठवले जात आहेत. एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत. अजूनही रोज अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत आहेत. मात्र बँक खात्याशी आधार नंबर लिंक असेल तरच महिलांना या योजनेचे पैसे मिळत आहेत. आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसल्याने साधारण 27 लाख पात्र महिलांना या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर घरबसल्या आधार क्रमांक बँक खात्याला कसे लिकं करायचे? हे जाणून घेऊ या...

 सर्वांत अगोदर माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना तुम्ही दिलेले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही? हे कसे तपासावे ते पाहुया.  हे तपासण्यासाठी तुम्हाला आधार कार्डच्या https://uidai.gov.in    या संकेतस्थळावर जावे लागेल.   

1. त्यासाठी गुगल वरती सर्च करा My Adhar 
2. आता तुमच्यासमोर माय आधारची वेबसाईट आली असेल त्यावर क्लिक करा. 
3. आता तुम्हाला तुमचा आधार नंबरने लॉगिन करायचं आहे. त्यासाठी आधार कार्ड नंबर आणि खाली दिलेल्या कॅपचा भरावा लागेल. 
4. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येआल तो टाका. 
5. ओटीपी टाकल्यानंतर आता तुम्ही आधार कार्डच्या संकेतस्थळावर लॉगिन झाले आहात. 
6. आता तुमच्यासमोर डॅशबोर्ड आला असेल.
7. आता तुम्हाला खाली Bank seeding status हा ऑप्शन आला असेल त्यावर क्लिक करा. 
8. आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, तुमच्या बँकेचे नाव, आणि तुमचा खाते अॅक्टिव्ह आहे की नाही याची संपूर्ण माहिती आली असेल.  

आता आपण बँकेला आधार क्रमांक कसा लिंक करायचा ते समजून घेऊया? 

1. सर्वात आधी तुम्हाला गुगल NPCI असं सर्च करायचं आहे. 
2. त्यानंतर खाली सर्च रिझल्टमध्ये तुम्हाला NPCI चे अधिकृत संकेतस्थळ दिसेल, त्यावर क्लिक करा. 
3. आता तुम्हाला consumer या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
4. त्यानंतर Bharat Aadhar Seeding या ऑप्शन वरती क्लिक करायचं. 
5. आता तुमच्यासमोर आणखी नवे पेज येईल. त्यावर आधार क्रमांक टाका. खाली Request for Aadhar ला seeding या पर्यायावर क्लिक करा. 
6. त्यानंतर खाली तुम्हाला ज्या बँकेचे खाते लिंक करायचे आहे त्या बँकेचं नाव निवडायचं आहे आणि खाली fresh seeding वर क्लिक करायचे आहे.
7. बँक निवडल्यानंतर आता तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे. 
8. टर्म्स अँड कंडिशन्सना वाचून त्यांचा स्वीकार करायचं आहे. त्यानंतर कॅपचा कोड आला असेल तो भरा आणि सबमिट करा. 

अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुमचा आधार कार्ड बँक सोबत लिंक करू शकता. 

हेही वाचा :

लाडक्या बहीणींना आणखी एक खुशखबर, अर्जाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; लाखो महिलांना होणार फायदा!

तुमच्या खात्यात अजून 3000 रुपये आले नाहीत? आता काय करावं? 'या' तीन गोष्टी समजून घ्या

लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी 'बँक सिडिंग स्टेटस' कसं चेक करायचं? जाणून घ्या A टू Z प्रक्रिया!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Singham Again : बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
Rupali Chakankar vs Rohini Khadse : रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sidco Home Lottery : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सिडकोच्या घरांचा धमाका, 40 हजार गरांची लॉटरी निघणारCongress Protest : काँग्रेसचं नाशिक, नागपुरात आंदोलन आंदोलकांची घोषणाबाजीManoj Jarange Brohters Meet Eknath Shinde : मनोज जरांगेंचा भाऊ  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीलाDhangar Reservation : एसटी आरक्षणात धनगर समाज समावेशाबाबत स्थापन समितीची बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Singham Again : बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
Rupali Chakankar vs Rohini Khadse : रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Dhule Crime: शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं,  बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं, बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
Embed widget