लाडक्या बहीणींना आणखी एक खुशखबर, अर्जाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; लाखो महिलांना होणार फायदा!
Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या एका निर्णयाचा आता लाखो महिलांना फायदा होणार आहे.
![लाडक्या बहीणींना आणखी एक खुशखबर, अर्जाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; लाखो महिलांना होणार फायदा! Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana state government extended last date of form submission for mazi ladki bahin scheme लाडक्या बहीणींना आणखी एक खुशखबर, अर्जाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; लाखो महिलांना होणार फायदा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/16/368b9f189351116293061c616607b35a1723795962637988_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सध्या राज्यभरात चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठी 3000 रुपये आले आहेत. दरम्यान, या योजनेसाठी महिलांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
17 ऑगस्टपर्यंत सन्मान निधी मिळणार
राज्य सरकारकडून महिलांनी केलेल्या अर्जांची युद्धपातळीवर तपासणी केली जात आहे. महिलांच्या अर्जांची छननी करून संबंधित महिला पात्र आहे की नाही, हे ठरवले जात आहे. 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात सरकारने 3000 रुपये टाकले आहेत. अजूनही 17 ऑगस्टपर्यंत महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळणार आहे.
आतापर्यंत 80 लाख महिलांना लाभ
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने आतापर्यंत 80 लाख महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी वितरित केला आहे. 14 ऑगस्टच्या रात्री साधारण 32 लाख पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ देण्यात आला. तर स्वातंत्र्यदिनी पहाटे 4 वाजता 48 लाख महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले. म्हणजेच सरकारने आतापर्यंत एकूण 80 लाख पात्र महिलांना या योजनेअंतर्गत पैसे पाठवले आहेत. सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
आता 31 ऑगस्टनंतरही अर्ज करता येणार
या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळेच 31 ऑगस्टपर्यंत अर्ज न करू शकणाऱ्या महिलांचे काय होणार? असा प्रश्न विचारला जात होता. यावरच आता महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट़ पर्यंतची मुदत ही अंतिम नाही. या योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया ही निरंतर चालणार आहे. त्यामुळे 31 ऑगस्टनंतर ज्या महिला अर्ज करतील त्यांचेही अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. 31 ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या पात्र महिलांनी या योजनेअंतर्गत सन्मान निधी दिला जाईल, असे तटकरे यांनी 11 ऑगस्ट रोजीच स्पष्ट केलेले आहे.
हेही वाचा :
तुमच्या खात्यात अजून 3000 रुपये आले नाहीत? आता काय करावं? 'या' तीन गोष्टी समजून घ्या
लाडकी बहीण योजनेचे लाभासाठी 'बँक सिडिंग स्टेटस' कसं चेक करायचं? जाणून घ्या A टू Z प्रक्रिया!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)