एक्स्प्लोर

शालेय सहलीमुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात 36 कोटींनी वाढ

शालेय सहलीसाठी शासन विद्यार्थ्यांना एसटीच्या प्रासंगिक करारावर 50 टक्के सवलत देते. त्यामुळे इतर खासगी बसेसच्या तुलनेत शाळांना एसटीने सहल काढणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे असते.

धुळे : शालेय सहल म्हणजे आपल्या विद्यार्थी जीवनातील "हळवा कोपरा"...!   विद्यार्थीजीवनात शालेय सहलीच्या माध्यमातून  आपण एसटीने  अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहिलेली असतील. त्यावेळी आपल्या वर्गमित्रा सोबत केलेली धमाल त्यांच्यासोबत काढलेले फोटो अशा अनेक आठवणी आपल्या मनात रुंजी घालत असतात. पण याच शालेय सहलींना गेल्या वर्षी ग्रहण लागले होते. पण यंदाच्या वर्षी मात्र एसटी महामंडळाने पुढाकार घेऊन, थेट मुख्याध्यापकांची भेट घेत शालेय सहली एसटीच्या बसेसमधून काढण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे  एसटी महामंडळाच्या उत्पन्नात 36 कोटींनी वाढ झाली आहे. शिक्षण विभागाने याआधी शालेय सहली संदर्भात एक परिपत्रक काढले. त्या परिपत्रकातील अटी-शर्ती म्हणजे शालेय सहली मुख्याध्यापकांनी काढूच नयेत यासाठी केलेला नकारात्मक खटाटोपच होता...! दोन वर्षांपूर्वी अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर काही शालेय मुले पोहताना बुडून मृत्युमुखी पडली होती. या घटनेच्या अनुषंगाने संबंधित शिक्षण संचालकांनी शालेय सहली संदर्भात  जाचक अटी -शर्तीचे परिपत्रक सर्व शाळांना पाठवले. त्यामुळे मुख्याध्यापकांनी शाळेत सहली काढण्याचे बंद केले. सहाजिकच शैक्षणिक वर्षातील एक चांगला उपक्रम बंद पडल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड तर झालाच. पण त्याचा अप्रत्यक्ष फटका एसटी महामंडळाला बसला होता. दरवर्षी शालेय सहलीच्या माध्यमातून एसटीला मिळणारे हमखास उत्पन्न एकदमच कमी झाले. 2017-18 या शैक्षणिक वर्षात शालेय सहलीच्या माध्यमातून एसटीला 63कोटी उत्पन्न मिळाले होते. ते या तथाकथित परिपत्रकामुळे 2018-19 मध्ये 24 कोटी पर्यंत घसरले. यंदाच्या वर्षी मात्र एसटी महामंडळाने पुढाकार घेऊन, थेट मुख्याध्यापकांना आवाहन केले. शालेय सहली एसटीच्या बसेसमधून काढाव्यात, यासाठी प्रत्येक आगाराचे प्रमुख शाळेत जाऊन शिक्षक, विद्यार्थ्यांना भेटले, त्यांना प्रोत्साहित केले. त्यामुळे 2019-20 या शालेय वर्षात एसटीला शालेय सहलीच्या माध्यमातून 60 कोटी रुपये उत्पन्न मिळाले. सन  2018-19 तुलनेत या वर्षीच्या उत्पन्नात 36 कोटींनी वाढ झाली आहे. शालेय सहलीसाठी शासन विद्यार्थ्यांना एसटीच्या प्रासंगिक करारावर 50 टक्के सवलत देते. त्यामुळे इतर खासगी बसेसच्या तुलनेत शाळांना एसटीने सहल काढणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे असते. त्यामुळे ग्रामीण भागात सर्वच शाळा प्रामुख्याने सहलीसाठी एसटीलाच प्राधान्य देतात. यंदा एसटी प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक पुढाकारामुळे अनेक शाळांनी सहली काढण्याचा प्रयत्न केला. अर्थात विद्यार्थ्यांसाठी शालेय सहलीच्या माध्यमातून एसटीने त्यांचा बालपणीच्या आठवणींचा  "हळवा कोपरा" मात्र जाणीवपूर्वक जपण्याचा प्रयत्न केला आहे, याचे कौतुक होत आहे ...! शालेय सहली :     वर्ष                                बसेसची संख्या                                 उत्पन्न (प्रतिपूर्तीसह)  2017-18                                 14547                                              63 कोटी 2018-19                                  5248                                              24 कोटी 2019-20                               10789                                              60 कोटी एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी शालेय सहलींचे योगदान हे खारुताई चा वाटा असला तरी,  सध्याच्या एसटीच्या आर्थिक स्थितीला खारू ताईचा  हा वाटा ‘मोलाचा’ ठरलाय .
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Embed widget