एक्स्प्लोर

'नीरा देवघर'चा वाद कोर्टात, खासदार रणजित निंबाळकर यांचा आंदोलनाचा इशारा

नीरा-देवघर कालव्यातल्या पाण्यासबंधी घेतलेल्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं खासदार रणजीत निंबाळकर यांनी सांगितलं आहे. हा निर्णय फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूरच्या 10 लाख दुष्काळी जनतेवर अन्यायकारक असून त्याविरोधात आंदोलन करणार असल्याचं खासदार निंबाळकरांनी सांगितलं.

पंढरपूर : नीरा देवघर आणि गुंजवणी धरणाचे 55 टक्के पाणी पुन्हा डाव्या कालव्यात सोडण्याचा महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर भागातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. आता ही लढाई रस्त्यावर आणि न्यायालयात लढण्याची घोषणा माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

कालवा नसलेल्या नीरा-देवघर धरणात 11.73 टीएमसी तर गुंजवणी धरणात 3.69 टीएमसी पाणीसाठा आहे. पूर्वी या बारामती, इंदापूरकडे जाणाऱ्या डाव्या कालव्यातून 57 टक्के तर फलटण, माळशिरस, सांगोला भागातील उजव्या कालव्यातून 43 टक्के असं या पाण्याचं वाटप करण्यात आलं होतं. कॉंग्रेस आघाडी सरकारमध्ये हे सूत्र बदलून बारामती भागाला 60 टक्के तर फलटण, माळशिरस भागाला 40 टक्के पाणी देण्याचा निर्णय झाला होता.

निरा उजवा-डावा कालव्यातील पाण्याचं समन्यायी वाटप होणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

यानंतर फडणवीस सरकारने पुन्हा हा निर्णय बदलून दुष्काळी फलटण भागाला पाणीवाटप करताना 7 टक्के पाणी जादा दिले होते. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि हा निर्णय मागे घेण्यासाठी दबाव टाकला. परंतु तरीही हा निर्णय कायम राहिला होता.

आता राज्यातील सत्ताबदलानंतर अजित पवार यांनी ताकद वापरत समन्यायी पाणी वाटपाच्या नावाखाली बारामती इंदापूर भागाला म्हणजे डाव्या कालव्यात 55 टक्के पाणी देण्याचा निर्णय घेतल्याने दुष्काळी भागात पुन्हा संघर्षाचे वातावरण तयार झाले आहे. विशेष म्हणजे पूर्वी शिवसेना या निर्णयासाठीच्या संघर्षात सामिल होती. आता मात्र अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद दाखवत पुन्हा दुष्काळी भागाचे पाणी बारामतीकडे वळवल्याने सांगोला भागात आंदोलनास सुरुवात झाली आहे. मंत्रिमंडळातील निर्णय निरा-देवघर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे विना वापर राहणारे पाणी समन्यायी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात निरा उजवा आणि डावा कालवा येथील लाभक्षेत्रास वाटप करण्याचा निर्णय काल (19 फेब्रुवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा फायदा दोन्ही कालव्यांच्या क्षेत्रात झालेले नागरीकरण, औद्योगीकरण, कृषीपूरक उद्योग, साखर कारखाने, फळबागांना होईल. निरा देवघर धरणाचे काम 2007 मध्ये पूर्ण झालं असून 11.73 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा निर्माण झालेला आहे. गुंजवणी धरणात सन 2018 पासून 3.69 टीएमसी पाणीसाठा निर्मित झालेला होता. या दोन्ही प्रकल्पांच्या कालव्याची कामे अपूर्ण असल्याने त्यांच्या नियोजित लाभक्षेत्रात पाणी वापर होऊ शकत नाही. ही बाब विचारात घेऊन या पाण्याचा वापर होण्याच्या दृष्टीने या दोन्ही धरणात उपलब्ध होणारे मूळ प्रकल्पाची गरज भागल्यावर शिल्लक राहणारे पाणी निरा डावा कालवा व निरा उजवा कालवा यात समन्यायी तत्वावर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे वाटप निरा डावा कालवा 55 टक्के आणि निरा उजवा कालवा 45 टक्के असं राहील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sthanik Swarajya Sanstha :स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांनंतर Ravindra Chavan प्रदेशाध्यक्ष?Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 12 Jan 2025 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 6.30 AM | 12 Jan 2025 | ABP MajhaABP Majha Headlines | 6.30 AM | 12 Jan 2025 | एबीपी माझा हेडलाईन्स | Maharashtra Politics

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Embed widget