Morning Headlines 21st July : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
इर्शाळवाडीतील बचावकार्याला पुन्हा सुरुवात; मदतकार्यात पाऊस, चिखल आणि धुक्याचं आव्हान
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या ठिकाणी दरड कोसळून दुर्घटना घडली. बुधवारी (19 जुलै) रात्री घडलेल्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 98 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. गुरुवारी (20 जुलै) संध्याकाळी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणच्या बचावकार्यात अडथळे येत होते, त्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आलं होतं. आज सकाळी 6.30 वाजता हे बचावकार्य पुन्हा सुरु करण्यात आलं आहे. वाचा सविस्तर
पंतप्रधान मोदी कुठे आहेत? तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांचा सवाल; मणिपूरच्या मुद्यावर राज्यसभेत जोरदार घमासान
मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ माजली आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी एकजूट करत मणिपूरच्या मुद्द्यावरुन सरकाराला घेरलं. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी तर ओरडत 'पंतप्रधान मोदी कुठे आहेत?' असा सवाल केला. वाचा सविस्तर
जयपूरमध्ये अर्ध्या तासात भूकंपाचे तीन जोरदार धक्के; लोक घाबरुन रस्त्यावर
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आज (शुक्रवारी) पहाटे अर्ध्या तासात भूकंपाचे तीन धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा धक्का इतका जोरदार होता की लोकांना स्फोटक आवाज ऐकू आला. भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक घाबरुन घराबाहेर पडताना दिसले. या घटनेमुळे जयपूरसह आजूबाजूच्या भागांत भूकंपाच्या धक्क्याने संपूर्ण शहर हादरले आहे. वाचा सविस्तर
पुढील तीन ते चार दिवस देशात जोरदार पावसाचा इशारा, दिल्लीत जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत उत्तर भारतात जोरदार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवस देशात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये पूर्व भारतातील राज्यांसह उत्तर आणि पश्चिम भारताच्या काही भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. वाचा सविस्तर
दिल्लीतील गरीब कुटुंबांना केजरीवाल सरकार देणार मोफत साखर; 2.80 लाखांहून अधिक लोकांना मिळणार लाभ
राजधानी दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील गरीब कुटुंबांना मोफत साखर देण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली मंत्रिमंडळाने गुरुवारी (20 जुलै) दिल्लीकरांना मोफत साखर उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. गरीब कुटुंबांना येणाऱ्या अडचणी कमी करणे आणि सर्वांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे हा सरकारच्या धोरणामागचा मुख्य उद्देश आहे. वाचा सविस्तर
2031 पर्यंत देशाची अणुऊर्जा निर्मिती क्षमता 7480 मेगावॉटवरुन 22840 मेगावॉट होईल : मंत्री जितेंद्र सिंह
देशाची अणुऊर्जा निर्मितीची सध्याची स्थापित क्षमता 23 अणुऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून 7480 मेगावॉट इतकी आहे. 2031 पर्यंत अणुऊर्जा निर्मितीची क्षमता 22480 मेगावॉटपर्यंत वाढेल, असे मत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केले. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. वाचा सविस्तर
बृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा, न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर
भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांना 25,000 हजारांच्या जातमुचलक्यावर नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे. दिल्लीच्या कोर्टाने बृजभूषण सिंह यांचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लैंगिक शोषणाच्या आरोप प्रकरणात बृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच बृजभूषण सिंह यांना देशाबाहेर जाता येणार नाही ही अट न्यायालयाने त्यांना जामीन देताना ठेवली आहे. वाचा सविस्तर
आजचा दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी ठरणार भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष आणि वृषभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. कर्क, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. त्याच वेळी, काही राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मेष ते मीन राशीसाठी आजचा शुक्रवार कसा राहील, काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर