एक्स्प्लोर

Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या बृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा, न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर

Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंनी भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. पंरतु या प्रकरणात बृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Brij Bhushan Sharan Singh: भाजपचे खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांना 25,000 हजारांच्या जातमुचलक्यावर नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे. दिल्लीच्या कोर्टाने (Delhi Court) बृजभूषण सिंह यांचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लैंगिक शोषणाच्या आरोप प्रकरणात बृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच बृजभूषण सिंह यांना देशाबाहेर जाता येणार नाही ही अट न्यायालयाने त्यांना जामीन देताना ठेवली आहे. 

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींवर कायद्यानुसार खटला चालवला जावा आणि दिलासा देण्यासाठी काही अटी घालण्यात याव्यात, असं सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलं.

कोर्टातील युक्तिवाद काय?

जामीन अर्जाला तुमचा विरोध आहे का असा प्रश्न यावेळी न्यायालयाने सरकारी वकिलांना विचारला. त्यावर सरकारी वकिलांनी म्हटलं की, "मी आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध करत नाही आणि समर्थनही करत नाही." "कायद्यानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार दाखल याचिकेवर निकाल देण्यात यावा," असं देखील त्यांनी म्हटलं आहे.' 

तर कुस्तीपटूंच्या वकिलांनी युक्तिवाद करत या जामीन अर्जाला विरोध केला. तसेच आरोपी अत्यंत प्रभावशाली व्यक्ती असल्याने त्यांना जामीन दिला जाऊ नये, असंही त्यांनी पुढे म्हटलं. "जर आरोपीला जामीन देणार असाल तर कठोर अटी आणि शर्तींसह घालायला हव्यात," असाही युक्तिवाद कुस्तीपटूंच्या वकिलांनी केला. 

तर बृजभूषण सिंह यांच्या वकिलांनी कोर्टात म्हटलं की, "बृजभूषण सिंह हे न्यायालयाने दिलेल्या नियमांचं योग्य पालन करतील. आरोपीला जामीन दिला पाहिजे. न्यायालयाने दिलेल्या सर्व नियम आणि अटींचे पालन करण्यात येईल अशी ग्वाही मी देतो." 

पोलीसांनी या प्रकरणात 1599 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यामध्ये बृजभूषण सिंह आणि कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपपत्रात एकूण 44 साक्षीदार आहेत. तर आरोपत्रात एकूण 108 लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये 15 लोकांनी कुस्तीपटू महिलांच्या बाजूने साक्ष दिली आहे. 

या कलमांतर्गत बृजभूषण सिंह यांच्यावर आरोप

पोलिसांच्या आरोपपत्रामध्ये बृजभूषण सिंह यांच्या विरोधात लैंगिक शोषण प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 354, 354-A आणि 354-D अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विनोद तोमर यांच्याविरोधात कलम 109, 354, 354 (A) आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

कलम  354 अंतर्गत आरोपीला पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. पण यामध्ये आरोपीला जामीनासाठी अर्ज करता येत नाही. तर कलम 354 (A) अंतर्गत आरोपीला एक वर्षाची शिक्षा होते पण यामध्ये आरोपी जामीनासाठी अर्ज दाखल करु शकतो. 

हेही वाचा : 

Jaipur Earthquake : जयपूरमध्ये अर्ध्या तासात भूकंपाचे तीन जोरदार धक्के; लोक घाबरून रस्त्यावर आले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget