एक्स्प्लोर

Morning Headlines 17th April : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

रामलल्लाच्या भाळी सूर्यतिलकाची मोहोर, रामलल्लावर रामनवमीच्या दिवशी कसा होईल सूर्यकिरणांचा अभिषेक?

आज रामनवमीची जगभरातल्या रामभक्तांना प्रतीक्षा आहे. 500 वर्षांनी प्रभू श्रीराम आपल्या जन्मभूमीत विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे. त्यामुळे मनी ध्यानी रामाचा जप करत अयोध्येमध्ये येण्यासाठी प्रत्येक रामभक्त आतुर आहेत. यंदाच्या रामनवमीचं सगळ्यात मोठं आकर्षण असेल रामलल्लाच्या मस्तकी होणारा सूर्यतिलक अर्थात सूर्य किरणांचा अभिषेक. वाचा सविस्तर...

Heat Wave : अंगाची लाहीलाही! मुंबई, ठाण्यासह कोकणाला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, या भागात पावसाची शक्यता

मुंबई : गेल्या काही दिवसात वातावरणात (Weather Update) अचानक मोठा बदल पाहायला मिळत आहे. राज्यात कुठे अवकाळी पावसाचं (Unseasonal Rain) सावट आहे, तर कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील 24 तासासाठी काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही भागात तापमानाता प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. आज कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. वाचा सविस्तर...

24 राज्ये, 284 जिल्हे आणि 100 मार्ग, वंदे भारत ट्रेनचा विक्रम, 5 वर्षात 2 कोटी लोकांनी केला प्रवास

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ही लोकांची पसंत बनत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात लोक या रेल्वेनं (Railway) प्रवास करत आहेत. वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होऊन पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात वंदे भारत एक्सप्रेस विक्रम केला आहे. तब्बल 284 जिल्हे, 24 राज्ये आणि 100 मार्गावरुन वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास सुरु आहे. पाच वर्षात 2 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. आत्तापर्यंत देशात 102 वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्या आहेत. वाचा सविस्तर...

ट्विटर वापरणं महागलं! एक्स युजर्सना पोस्ट, लाईक आणि रिप्लायसाठी मोजावे लागणार पैसे, एलॉन मस्कचा मोठा झटका

मुंबई : ट्विटर (Twitter) म्हणजे एक्स (X) मीडिया वापरणं आता महागडं ठरणार आहे. ट्विटर युजर्सना आता एक्स (X) वर पोस्ट (Post) लिहिण्यासाठी, लाईक (Like) करण्यासाठी आणि रिप्लाय (Reply) म्हणजे देण्यासाठी शुल्क भरावं लागणार आहे. टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी यासंबंधित मोठी घोषणा केली आहे. एक्स मीडिया प्लॅटफॉर्मवर आता शुल्क आकरण्यात येणार असल्याने सर्व सोशल मीडिया वापरकर्त्यांना धक्का बसला आहे. वाचा सविस्तर...

35 वर्षे आमदारकी, 20 वर्षे लाल दिव्याची गाडी, एकदा हरले की लगेच पक्ष बदलला; गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका

जळगाव : भाजप (BJP)  नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse)  यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.35 वर्षे आमदारकी भोगली, 20 वर्षे लाल दिव्याच्या गाडीत फिरले. एकदा निवडणुकीत हरले की लगेच पक्ष बदलला, ही निष्ठा आहे का? त्यामुळे पक्ष आहे म्हणून आपण आहोत, असं महाजन म्हणाले.तसेच 'माझ्यामुळे पक्ष आहे, अशा अविर्भावात फिरणारे आता कुठे गेले? असा सवाल देखील गिरीश महाजनांनी या वेळी उपस्थित केला. ते जळगावात बोलत होते. वाचा सविस्तर...

Uttam Jankar : विशेष विमानानं नागपूरला जाऊन फडणवीसांची भेट, उत्तम जानकर शरद पवारांच्या भेटीला, माढ्यात नवा ट्विस्ट

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघाच्या (Madha Lok Sabha Seat) निवडणुकीत माळशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांचं महत्त्व वाढलं आहे.विशेष विमानानं नागपूरला जाऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणाऱ्या उत्तम जानकर आज शरद पवारांची (Sharad Pawar ) भेट घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं उत्तम जानकर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर...

RR vs KKR : मॅच जिंकणार हा आत्मविश्वास कुणी दिला? शतकवीर जोस बटलर नव्हे, संजू सॅमसननं घेतलं दुसऱ्या खेळाडूचं नाव...

कोलकाता नाईट रायडर्सनं सुनील नरेनच्या शतकाच्या जोरावर 6 बाद 223 धावा केल्या. या धावांचा पाठलाग राजस्थाननं यशस्वीरित्या केल्या.  राजस्थाननं दोन विकेट राखून विजय मिळवला. जोस बटलरनं (Jos Butler) केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर राजस्थाननं विजयावर नाव कोरलं. मॅचनंतर बोलताना कॅप्टन संजू सॅमसन यानं विजयाचा आत्मविश्वास कुणामुळं बोलताना जोस बटलर ऐवजी दुसऱ्या खेळाडूचं नाव घेतलं. वाचा सविस्तर...

Horoscope Today 17 April 2024 : आजचा बुधवार खास! मेषसह 'या' राशींच्या जीवनात घडणार महत्त्वाचे बदल; वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 17 April 2024 : पंचांगानुसार, आज 17 एप्रिल 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. चैत्र महिन्याचा नववा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा बुधवारचा दिवस  कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget