Astrology : यंदाचा प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Astrology 26 January 2025 : यंदाचा प्रजासत्ताक दिन काही राशींसाठी विशेष ठरणार आहे. या काळात मोठ्या ग्रहांच्या हालचाली होत आहेत, जे 3 राशींचं नशीब पालटू शकतात.
Astrology 26 January 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, 26 जानेवारीपासून (Republic Day 2025) अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. 26 जानेवारीला सकाळी 5 वाजून 21 मिनिटांनी शुक्र आणि मंगळ नवपंचम योग तयार करतील. ग्रहांच्या स्थितीनुसार, शुक्र नवव्या भावात आणि मंगळ पाचव्या भावात असेल. अशा स्थितीत काही राशींचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या राशींना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नवपंचम योगामुळे 26 जानेवारीपासून कोणत्या राशी (Zodiac Signs) सुखात जीवन जगणार? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
नवपंचम योगाची निर्मिती वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्याची ठरू शकते. या काळात तुमच्या सर्व नियोजित योजना यशस्वी होतील. नोकरदारांना नवीन नोकरीच्या ऑफर आणि व्यावसायिकांना नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. कुटुंबात शांती आणि आनंदाचं वातावरण राहील. नोकरी करतात त्यांचं कामाच्या ठिकाणी कौतुक होईल आणि प्रमोशनचीही आहे. नवीन संधी आर्थिक स्थिती मजबूत करतील. त्याचबरोबर व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो.
मेष रास (Aries)
नवपंचम योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे मिळवण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. या काळात तुम्ही देश-विदेशात फिरू शकता. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. विद्यार्थी उच्च शिक्षणात यश मिळवतील आणि स्पर्धा परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करतील. घरात आनंदाचं वातावरण राहील. जुने कौटुंबिक वाद मिटतील. यावेळी तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. तसेच, तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील.
मकर रास (Capricorn)
नवपंचम योग तुमच्यासाठी लाभाचा ठरू शकतो. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही एखादं वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय देखील घेऊ शकता. यावेळी कुटुंबात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ आणि गुंतवणुकीच्या नवीन संधी मिळू शकतात. तसेच या काळात तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास देखील करू शकता. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सन्मान आणि भरपूर पैसा मिळेल. व्यावसायिकांना विशेष लाभ मिळेल आणि फालतू खर्च कमी होतील. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी उघडतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: