Astrology : आज प्रजासत्ताकदिनी बनले मोठे शुभ योग; 3 राशींना होणार याचा मोठा लाभ, मनातील इच्छा होणार पूर्ण
Panchang 26 January 2025 : आज रविवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी बुधादित्य योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 3 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology Panchang 26 January 2025 : आज रविवार, 26 जानेवारी रोजी सूर्य बुधासोबत मकर राशीत भ्रमण करेल, यावेळी बुधादित्य योगाटी निर्मिती होणार आहे. रविवारचा स्वामी देखील सूर्यदेव आहे आणि या दिवशी तील द्वादशीचा योग आहे. धनु राशीत चंद्राच्या भ्रमणामुळे आज धन योगासह इतर शुभ योगही तयार होत आहेत. या योगांमुळे आजचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा असणार आहे. या लकी राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
आज 28 जानेवारी, वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप आनंदाचा दिवस असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्ही काही शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. व्यवसायातही कामाची परिस्थिती चांगली राहील. जे लोक खाद्यपदार्थ आणि मेकअपच्या प्रोडक्ट्सचा व्यवसाय करतात त्यांची कमाई खूप चांगली होईल. प्रेम जीवनात तुम्ही तुमच्या प्रियकरासह रोमँटिक वेळ घालवाल. तुम्हाला सरप्राईज मिळू शकतं. तुम्ही मित्र आणि नातेवाईकांसोबत चांगला वेळ घालवाल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. दूर राहणाऱ्या तुमच्या मित्राकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक जीवनही आनंदी असेल. मुलांना चांगलं काम करताना पाहून तुम्हाला आनंद वाटेल. व्यावसायिकांच्या कमाईत वाढ होईल. सरकारी योजनांचा लाभही मिळू शकतो. सामाजिक आणि राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांचा प्रभाव आणि आदर वाढेल. सामाजिक क्षेत्रातही तुमचा प्रभाव वाढेल. तुमच्या प्रियकराकडून तुम्हाला सरप्राईज मिळू शकतं. तुमची कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होईल. आज काही शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस व्यस्त असेल. आज तुम्ही ठरवलेली कामं पूर्ण करण्यात तुम्हाला यश मिळेल. सामाजिक क्षेत्रातील काही काम असेल तर तेही तुमच्याकडून पूर्ण होऊ शकतं. तुमचे मित्र आणि नातेवाईक यांच्याशी देखील चांगले संबंध असतील आणि तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसोबत मनोरंजक वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्हाला व्यवसायात चांगली डील मिळाल्याने आनंद होईल. जे लोक आज कामावर जातील, त्यांना अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. वरिष्ठांच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभ होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: