35 वर्षे आमदारकी, 20 वर्षे लाल दिव्याची गाडी, एकदा हरले की लगेच पक्ष बदलला; गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका
Girish Mahajan: माझ्यामुळे पक्ष आहे, अशा अविर्भावात फिरणारे आता कुठे गेले? असा सवाल देखील गिरीश महाजनांनी या वेळी उपस्थित केला.
जळगाव : भाजप (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.35 वर्षे आमदारकी भोगली, 20 वर्षे लाल दिव्याच्या गाडीत फिरले. एकदा निवडणुकीत हरले की लगेच पक्ष बदलला, ही निष्ठा आहे का? त्यामुळे पक्ष आहे म्हणून आपण आहोत, असं महाजन म्हणाले.तसेच 'माझ्यामुळे पक्ष आहे, अशा अविर्भावात फिरणारे आता कुठे गेले? असा सवाल देखील गिरीश महाजनांनी या वेळी उपस्थित केला. ते जळगावात बोलत होते.
गिरीश म्हाजन म्हणाले, मी म्हणणारे होते त्यांचे काय झालं तुम्ही सर्वांनी बघितले आहे. 35 वर्ष आमदारकी भोगली, 20 वर्ष लाल दिव्याच्या गाडीत फिरले. माझ्यामुळे पक्ष आहे म्हणून पक्ष अशा अविर्भावात फिरणारे लोक आता कुठे झाले? एकदा पक्षातून पडले तर पक्ष बदलले. ही काय निष्ठा...त्यामुळे पक्ष आहे म्हणून आपण आहोत. एकदा की काय तुम्ही निवडणुकीत हरले की लगेच पक्ष बदलला.
उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले : गिरीश महाजन
शिवसेना ही उद्धव ठाकरेंची नकली सेना आहे.चिन्ह, नाव देखील गेलं, एवढच काय कार्यकर्ते देखील उरले नाही. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे.आता याचा राग येऊन उद्धव ठाकरेंनी जी टीका केली आहे. यावरुन राजकारणाचा स्थर खालवला आहे. त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. लोक पक्ष सोडत असल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना उपचाराची अधिक गरज आहे, असे गिरीश महाजन म्हणाले.
करण पवारांची टीका
महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता भाजपावर टीका केली आहे. भाजपा हा जुमले बाजीचा पक्ष आहे यातूनच ते पाच लाख मतांनी निवडून येणार असल्याचं सांगत आहेत. मात्र कोणतीही विकास कामे यांनी केली नाहीत. केवळ द्वेषाचे राजकारण केले आहे,आपण विकासाच्या बाबत काम करणार असल्याचं सांगत,जनता आपल्या पाठीशी असल्याने आपला विजय निश्चित होईल. भाजपने बदल्याचे राजकारण केले आपण बदल घडविण्याबरोबर विकासचे राजकारण करणार आहोत.
उन्मेष पाटील यांच्या प्रवेशाने राजकीय क्षेत्रात खळबळ
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले गेल्यानंतर त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. भाजपाकडून खासदार असताना देशपातळीवर चांगले काम केले असताना ही तिकीट कापले गेल्यानंतर उन्मेष पाटील आणि त्यांचे समर्थक यांची चांगलीच नाराजी उफाळून आल्याचं पाहायला मिळत होते. या नाराजीतून त्यांनी भाजप सोडून उद्धव ठाकरे यांच्या सेनेत प्रवेश करून सगळ्यांना मोठा धक्का दिला. करन पवार आणि खासदार उन्मेष पाटील हे जरी शिवसेनेत आले असले तरी त्यांचे शेकडो समर्थक भाजपामध्ये राहिले होते. मात्र महाविकास आघाडीच्या मेळाव्यात चाळीस गाव तालुक्यातील शेकडो उन्मेष पाटील समर्थक भाजपा कार्यकर्त्यांनी उन्मेष पाटील यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा :