एक्स्प्लोर

RR vs KKR : मॅच जिंकणार हा आत्मविश्वास कुणी दिला? शतकवीर जोस बटलर नव्हे, संजू सॅमसननं घेतलं दुसऱ्या खेळाडूचं नाव...

Sanju Samson : राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन यानं कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या मॅचमध्ये विजय मिळवून देणाऱ्या जोस बटलरचं कौतुक केलं आहे. 

कोलकाता : संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या नेतृत्त्वातील राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) आयपीएलच्या (IPL 2024) 31 व्या मॅचमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वातील कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) दोन विकेटनी पराभव केला. ईडन्स गार्डन्सवर झालेल्या मॅचमध्ये दोन्ही संघांकडून चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला.कोलकाता नाईट रायडर्सनं सुनील नरेनच्या शतकाच्या जोरावर 6 बाद 223 धावा केल्या. या धावांचा पाठलाग राजस्थाननं यशस्वीरित्या केल्या.  राजस्थाननं दोन विकेट राखून विजय मिळवला. जोस बटलरनं (Jos Butler) केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर राजस्थाननं विजयावर नाव कोरलं. मॅचनंतर बोलताना कॅप्टन संजू सॅमसन यानं विजयाचा आत्मविश्वास कुणामुळं बोलताना जोस बटलर ऐवजी दुसऱ्या खेळाडूचं नाव घेतलं. 

पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमनं सुनील नरेनच्या शतकी खेळीच्या जोरावर धावांचा डोंगर उभा केला. संजू सॅमसननं राजस्थानच्या सर्व बॉलर्सचा वापर केला मात्र नरेनला रोखण्यात त्यांना अपयश आलं. नरेननं 56 बॉलमध्ये 109 धावांची खेळी केली. याच्या जोरावर केकेआरनं 6 बाद 223 धावा केल्या. 

केकेआरनं दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि कॅप्टन संजू सॅमसन चांगली खेळी करु शकले नाहीत. एका बाजूनं नियमित अंतरानं राजस्थानचे फलंदाज बाद होत असताना जोस बटलरनं मैदानावर तळ ठोकला. त्यानं नऊ चौकार  आणि सहा सिक्सच्या जोरावर विजय मिळवला. जोस बटलरनं 60 बॉलमध्ये 107 धावांची खेळी केली.  

राजस्थाननं अखेरच्या ओव्हरमध्ये मॅच जिंकली. कॅप्टन संजू सॅमसन यानं मॅचविषयी बोलताना म्हटलं की आम्ही मॅच जिंकू शकतो असा आत्मविश्वास आम्हाला रोव्हमन पॉवेलच्या वादळी खेळीच्या वेळी मिळाला.  रोव्हमन पॉवेल यानं 13 बॉलमध्ये 26 धावांची खेळी केली. त्यामध्ये त्यानं तीन सिक्स आणि एक चोकार मारला."विजयानंतर आनंद झाला असून आम्ही विकेट गमावत असल्यानं पराभव होईल असं वाटत असताना रोव्हमन पॉवेल यानं ज्या प्रकारे सिक्स मारले ते पाहिल्यावर  विजय मिळवू" असं वाटल्याचं संजू सॅमसन यानं म्हटलं. 

संजू सॅमसननं कोलकाता नाईट रायडर्सच्या बॉलर्सचं कौतुक देखील केलं. यानंतर संजू सॅमसन यानं जोस बटलरवर कौतुकाचा वर्षाव केला. जोस राजस्थानच्या टीमसाठी 6 ते 7 वर्षांपासून खेळत असून त्यामुळं आनंदी आहे. योग्यवेळी त्यानं धावा केल्या. तो सलामीवीर असेल आणि योग्यवेळी फॉर्ममध्ये आल्यास कोणतीही धावसंख्या यशस्वीपणे गाठता येईल. तो काहीतरी विशेष करतो, असं संजू सॅमसन म्हणाला. 

संबंधित बातम्या :

KKR vs RR : शाहरुखचा दिलदारपणा, पराभवाचं दु:ख विसरुन जोस बटलरचं कौतुक, मिठी मारत शतकी खेळीचं अभिनंदन ,पाहा व्हिडीओ

जोस द बॉस.... बाजीगर बटलरचं  झंझावती शतक, राजस्थानचा केकेआरवर सनसनाटी विजय!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Embed widget