Horoscope Today 17 April 2024 : आजचा बुधवार खास! मेषसह 'या' राशींच्या जीवनात घडणार महत्त्वाचे बदल; वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 17 April 2024 : आज चैत्र महिन्याचा नववा आणि शेवटचा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो.
Horoscope Today 17 April 2024 : पंचांगानुसार, आज 17 एप्रिल 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. चैत्र महिन्याचा नववा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा बुधवारचा दिवस कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास
जोडीदाराशी जमवून घ्यावे लागेल. अविचारी साहसी वृत्तीला आळा घाला. कोणत्याही कामात युक्तीचा किंवा बुद्धीचा योग्य वापर न करता आल्यामुळे त्रास सहन करावा लागेल.
वृषभ रास
संततीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नोकरी व्यवसायात अत्यंत मेहनतीने आणि कष्टाने कामे पार पाडाल.
मिथुन रास
आर्थिक घडी मनाजोगी बसेल. महिलांना एरवीपेक्षा जास्त संततीकडे सर्व बाबतीत लक्ष द्यावे लागेल.
कर्क रास
तुमच्या भावनांना एक वेगळीच झळाळी येणार आहे. संघर्षात्मक परिस्थितीत सुद्धा ताठ मानेने जगाल.
सिंह रास
घरामध्ये तुमचे विचार इतरांना न पटल्यामुळे थोडेसे मतभेद होतील. तरुणांना जोडीदार मिळेल.
कन्या रास
एखाद्या प्रेम प्रकरणाची सुरुवात होऊ शकते, त्यामुळे एका वेगळ्या दुनियेत वावराल. वाहने जपून चालवा.
तूळ रास
आज काही गोष्टी मनासारख्या न झाल्यामुळे मानसिक अस्थिरता जाणवेल. वागण्या बोलण्यातील ठामपणा थोडा कमी होईल.
वृश्चिक रास
आज परिस्थितीचे योग्य आकलन न झाल्यामुळे निर्णय पटकन घेऊ शकणार नाही. महिला थोड्या विसर भोळ्या बनतील.
धनु रास
मित्र-मैत्रिणींवर जास्त विश्वास न ठेवणे योग्य ठरेल. कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नका. नवनवीन संकल्पना मनात येतील.
मकर रास
कर्माला धाडसाची जोड मिळेल, त्यामुळे कामे पूर्ण होतील. कुटुंबामध्ये वाद झाले तरी दुर्लक्ष कराल. आजचा दिवस तसा सामान्य असेल.
कुंभ रास
खूप काम कराल. कोणतेही आर्थिक निर्णय तज्ञांचा सल्ला घेऊन करा. महिलांना खरेदीचा मूड राहील. आज पैसे खर्च करताना दोनदा विचार करा, जास्त पैसे खर्च करू नका.
मीन रास
कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात. भावंडांची काळजी घ्यावी लागेल. महिलांच्या रसिक स्वभावाला पूरक ग्रहमान आहे.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: