एक्स्प्लोर

21 जूनपर्यंत मान्सून कोकणात, तर 24 जूनपर्यंत महाराष्ट्रभर व्यापणार, हवामान विभागाची माहिती

आधीच लांबलेल्या मान्सूनच्या प्रवासात ‘वायू’ वादळानं खोडा घातला होता. त्यामुळे पावसाने मोठी दडी मारली आहे. मान्सून लांबणीवर गेल्यामुळे राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

पुणे : संपूर्ण महाराष्टाला प्रतीक्षा असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने राज्यात वर्दी दिली असली तरी शेतकरी वर्ग मात्र मोसमी पावसाची वाट बघत बसला आहे. त्यामुळे दुष्काळानं होरपळलेल्या महाराष्ट्राला ताटकळत ठेवणारा मान्सून आता अखेर 21 जूनला कोकणात दाखल होणार आहे. तर 24 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र दाखल होईल.  याबाबतची माहिती माहिती हवामान खात्यानं दिली आहे. आधीच लांबलेल्या मान्सूनच्या प्रवासात ‘वायू’ वादळानं खोडा घातला होता. त्यामुळे पावसाने मोठी दडी मारली आहे. मान्सून लांबणीवर गेल्यामुळे राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.  मात्र अरबी आणि बंगालच्या उपसागरातले मान्सूनचे वारे सशक्त होऊन 24 तारखेपर्यंत महाराष्ट्रात वरुणराजा बरसेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे VIDEO | बुलडाणा जिल्ह्यात पाण्यासाठी जिवाचा जुगार | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा राज्याने यंदा उन्हाळ्याचे तीव्र चटके सहन केले आहेत. विदर्भ आणि मराठवाडय़ाच्या काही भागात अजूनही उष्णतेची लाट कायम आहे. बहुतांश ठिकाणी दुष्काळी स्थिती आहे. राज्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस कोसळत असला, तरी शेतकरी दुष्काळी स्थिती दूर होण्यासाठी मोसमी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. सद्य:स्थितीला चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. पुढील काही दिवसांत ते ओसरणार आहे. त्यामुळे मोसमी वाऱ्यांच्या पुढच्या प्रवासासाठी वाट मोकळी झाली आहे. यंदा मान्सून खूपच लांबला आहे. अजूनही मान्सून केरळमध्ये पोहोचलेला नाही. परंतु मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे, हे कसे समजते? मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे निकष कोणते? असे प्रश्न अनेकांना पडतात. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे, हे ठरवण्यासाठी तीन प्रमुख निकष आहेत. Hingoli | अपुऱ्या पावसाच्या भरवशावर पेरणीला सुरुवात, दुबार पेरणीचं संकट | हिंगोली | ABP Majha निकष पहिला  पाऊस (RAINFALL)–भारतीय हवामान विभागाची केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर 14 केंद्र आहेत, त्यातल्या 60 टक्के म्हणजे 8 ते 9 केंद्रावर सलग दोन दिवस किंवा दोन दिवसांपेक्षा जास्त वेळ 2.5 मिलिमीटर किंवा त्याहून अधिक पावसाची नोंद झाली तर मान्सूनची वर्दी समजली जाते, दुसऱ्या दिवशी हवामान विभाग मान्सून भारतभूमीवर आला अशी घोषणा करतं, मात्र त्यासाठी आणखी दोन निकष पाहिले जातात. निकष दुसरा वाऱ्याचं क्षेत्र (WIND FIELD)–पश्चिमी वारे ठराविक वेगाने (ताशी 25 ते 35 किलोमीटर) आणि ठराविक दाबाने (600 हेक्टोपास्कल) वाहत असेल तर मान्सूनच्या आगमनाला पुष्टी मिळते. निकष तिसरा बहिर्गामी दीर्घतरंग प्रारण अर्थात Outgoing Longwave Radiation (OLR)– थोडक्यात उपग्रहांच्या आधारे त्या ठिकाणी ठराविक उर्जा आणि उष्णता आहे हे समजणे महत्त्वाचे आहे. Water Scarcity | संपूर्ण महाराष्ट्रावर पाणीसंकट, धरणांत 7.7 टक्के पाणीसाठा | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget