एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दहावी बोर्ड परीक्षांच्या सरावासाठी उस्मानाबादेत मॉक टेस्ट
उस्मानाबाद : बोर्डाच्या परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांपासून त्यांचे पालक, शिक्षक सगळ्यांनाच त्याचं टेन्शन असतं. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षांच्या वातावरणाशी जुळवताना अडचणी येतात. यासाठी उस्मानाबादेतील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कौतुकास्पद उपक्रम राबवला जाणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दहावी बोर्डाच्या 'मॉक टेस्ट' घेतल्या जाणार आहेत. मॉक टेस्ट म्हणजे प्रत्यक्ष बोर्ड परीक्षांप्रमाणे वातावरणनिर्मिती करुन परीक्षा घेतल्या जाणार. विद्यार्थी अभ्यासाच्या तणावाखाली असताना त्यांना त्या वातावरणाशी जुळवून घेणं सोपं जावं, यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे.
दहावी बोर्डाच्या परीक्षांसाठी शासनाकडून राबवला जाणारा पहिलाच प्रयत्न मानला जात आहे. बोर्डाला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी असलेल्या नियमांपासून याची सुरुवात होईल. हॉलतिकीट, प्रश्न आणि उत्तरपत्रिका, कडक पर्यवेक्षण असे सर्व प्रयत्न असतील. शाळेबाहेरचे पर्यवेक्षक बोलावले जाणार असून पेपरही शाळेबाहेरील शिक्षकांकडून तपासले जातील.
विद्यार्थी या वातावरणाला सरावले, तर बोर्ड परीक्षेत त्यांची टक्केवारी वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आठ जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या 390 विद्यार्थ्यांना शासनाच्या या उपक्रमाचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे या मॉक एसएससी परीक्षेचा निकाल एकट्या विद्यार्थ्यालाच सांगण्यात येईल. त्यानंतर सुधारणेसाठी सराव वर्गही घेण्यात येतील.
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मॉक टेस्टची कल्पना मांडली होती. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करणं, शंभर टक्के निकाल देणं यासाठी हे उपयुक्त असल्याचं ते म्हणाले. प्रीलिम परीक्षा सर्वसामान्यपणे शाळांमध्ये घेतल्या जातातच, मात्र मॉक एक्झॅम या त्याच्या एक पाऊल पुढे जातात.
परीक्षेच्या वातावरणाच्या भीतीमुळेच गुणवत्ता असूनही ग्रामीण भागातील विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत मागे राहतात. त्यांना वाव देण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात येत आहे. डिसेंबरमध्ये अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर तीन प्रीलिम परीक्षा घेतल्या जातात. मात्र मॉक परीक्षेमुळे वातावरणात गांभीर्य येईल आणि यश मिळेल, अशी खात्री जिल्हाधिकाऱ्यांना वाटते.
शाळा पातळीवर घेतल्या जाणाऱ्या सराव परीक्षेत तेवढे गांभीर्य नसतं, ते या परीक्षेत आहे, पूर्णपणे बोर्डाच्या परीक्षेचा अनुभव यात आहे, असं या उपक्रमाचे नोडल ऑफिसर शिवकुमार बिराजदार यांनी सांगितलं. पालक आणि विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद या उपक्रमाला मिळत आहे.
उस्मानाबादेतल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 13 जानेवारीपर्यंत एसएससीच्या 9 विषयांची मॉक टेस्ट घेण्यात येईल. इंग्रजी, गणित, विज्ञान अशा सर्वच विषयांचा यात समावेश असून तीनच दिवसात निकाल लावण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिकरित्या निकाल सांगण्यात येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement