एक्स्प्लोर
Advertisement
पुण्याचं पाणी दौंडला देण्यावरुन मनसेचा राडा, तोडफोड करणारे अटकेत
पुणे : पुण्याहून दौंडला पाणी देण्याचा विरोध करत, जलसंपदा विभाग अभियंत्याच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मनसे नगरसेवक रवींद्र धंगेकर आणि काही कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांवर दंगलीचा आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड, इंदापूरला 1 टीएमसी पाणी!
पुण्यातून दौंड आणि इंदापूर तालुक्यांना एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गिरीष बापट यांनी दिली. त्यानुसार खडकवासला धरणातून 4 मे म्हणजेच आजपासून पाणी सोडण्यात येणार आहे. मात्र याचवेळी पुण्यात वाढीव पाणीकपात होणार नाही, अशी ग्वाहीदेखील बापट यांनी दिली.
मात्र स्थानिक पक्षांना विश्वासात न घेता पालकमंत्री गिरीष बापटांनी पुण्याहून दौंडला परस्पर पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करत मनसेने जलसंपदा विभाग अभियंत्याच्या कार्यालयाची तोडफोड केली.
महापौरांसह इतर राजकीय पक्षांचाही निर्णयाला विरोध
दुसरीकडे पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेनेही या निर्णयाला विरोध केल आहे. तसंच सजग नागरिक मंच या निर्णयाच्या विरोधात आहे.
चीप पॉप्युलॅरिटीसाठी मनसेचं आंदोलन
दरम्यान मनसेने केवळ प्रसिद्धीसाठी आंदोलन केलं. 'चीप पॉप्युलॅरिटी'साठी त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली आहे, असा आरोप जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. तसंच सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावं. कोणीही, कुठेही पाण्यावरुन फक्त प्रसिद्धीसाठी आंदोलन करु नये, असं आवाहनही त्यांनी केलं. याशिवाय तोडफोड करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement