एक्स्प्लोर

पोलीस सुरक्षा बाजूला कर, मी समोर येतो एकदा काय ते होऊनच जाऊ दे! मनसे सरचिटणीसांचे अमोल मिटकरींना थेट आव्हान

Amol Mitkari vs MNS : मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी अमोल मिटकरींना थेट आव्हान देत टीकेची झोड उठवली आहे.

Akola Amol Mitkari vs MNS : आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना माझं ओपन चॅलेज आहे. पोलिस सुरक्षा बाजूला कर, मी समोर येतो अन् एकदा काय ते होऊनच जाऊ दे, असा थेट आव्हान मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे (Karnabala Dunbale) अमोल मिटकारींना दिलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंवर (Raj Thackeray) केलेल्या एका वक्तव्याने राज्याचा राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला आहे.

यात संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यात  (Akola News) राडा घालत अमोल मिटकरी चक्क गाडी फोडल्याची घटना घडलीय. मिटकरींच्या गाडी तोडफोड आणि राडा प्रकरणात आता पर्यंत 13 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर यातील तिसरा संशयित आरोपीलाही आता ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान आता मनसे सरचिटणीसांचे अमोल मिटकरींना थेट आव्हान दिल्याने आता मनसे विरुद्ध राष्ट्रवादीतील हा वाद टोकाला गेल्याचा दिसून येतंय.

मिटकरी हे अजित दादांना बुडवल्या शिवाय राहणार नाही- कर्णबाळा दुनबळे

आमदार अमोल मिटकरी हे कोणाबद्दल कधी चांगलं बोलले आहे का? ज्या सुप्रीया ताईंनी त्यांना पक्षात स्थान दिलं, त्यांना यांनी सोडलं नाही. हा माणूस अजित दादांना बुडवल्या शिवाय राहणार नाही. मी उद्या अकोल्यात जातोय. पोलिसांना सर्व सहकार्य करणार. मात्र, राज साहेबांबाबत एकही चुकीची गोष्ट एकूण घेणार नाही. गरज पडल्यास अमोल मिटकरींना जशास तसं उत्तर दिलं जाणार, अशी प्रतिक्रियाही मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी दिली.

मनसे कार्यकर्त्यांच्या राड्यात एका कार्यकर्त्याचा दुदैवी मृत्यू 

दरम्यान, काल मिटकरी यांच्यावर झालेला हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडीवरील तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यावेळी अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या राड्यात जय मालोकार हा देखील सहभागी होता. राड्यानंतर मालोकार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालोकार यांच्या छातीत दुखत असल्याने उपचारार्थ रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यात जय मालोकार यांचा मृत्यू झालाय. दरम्यान, जय मालोकार या मनसे कार्यकर्त्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.  

जिल्ह्यातील निंबी मालोकार या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहे. याआधी जयचा मृतदेह अकोल्यातील मोठी उमरी भागातील विठ्ठल नगरातील निवासस्थानी नेण्यात आला होता. यावेळी निंबीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अंत्यसंस्काराला मनसेचे अनेक मोठे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

कोण आहे मरण पावलेला मृत मनसे कार्यकर्ता?

- जय मालोकार मनसेच्या विद्यार्थी आघाडीचा अकोला जिल्हा उपाध्यक्ष. 
- सध्या परभणी येथे होमिओपॅथी मेडिकल शिक्षणाच्या तिसऱ्या वर्षाला. 
- अकोल्यातील उमरी भागात वास्तव्यास.
- गेल्या पाच वर्षांपासून मनसेमध्ये सक्रियपणे कार्यरत.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Embed widget